Join us

फॅट टू फिट! आत्ताची बिग बॉस मराठी फेम आरती सोळंकीला पाहाल तर पाहातच राहाल, घटवलं ५० किलो वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 7:15 PM

Aarti Solanki : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री आरती सोळंकी सातत्याने चर्चेत येत आहे. तिने तिचं तब्बल ५० किलो वजन घटवलं आहे. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळे थक्क झाले आहेत.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री आरती सोळंकी सातत्याने चर्चेत येत आहे. त्याला कारणही तसे खास आहे. आरतीने तिचं तब्बल ५० किलो वजन घटवलं आहे. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळे थक्क झाले आहेत. नुकतेच आरतीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वजन कमी कसे केले आणि तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.

आरती सोलंकीने वजन घटवण्याचा निर्णय का घेतला, याबद्दल मुलाखतीत सांगितले की, खरंतर मी ४९ किलो वजन कमी झाले आहे. मी घरातल्या आरशासमोर कधीच उभी राहिली नव्हती. कारण मी टॉमबॉय आहे. पण जेव्हापासून सगळे मला आता तू बारीक झालीयेस, छान दिसतेस असं म्हटल्यावर मी आरशात पाहायला सुरुवात केली. आता सगळेच मला आता तू छान राहा असे सांगत आहेत. म्हणून मी समोच्यांसाठी तयार होतेय. आता मला कुठे वाटतंय की खरंच माझ्यात बदल घडला आहे. खरेतर बदल घडावा म्हणून मी प्रयत्न केले. जी मी मेहनत घेतले त्याचे फळ मला मिळतंय आहे.

आरती पुढे म्हणाली की, लॉकडाउनच्या आधी माझं १००च्या आसपास होते. मग लॉकडाउनमध्ये माझं वजय १३२ झालं. मग स्टार प्रवाहवर मला कॉमेडी शोसाठी विचारलं. त्या शोमध्ये काम करत असताना मला उठता बसता येत नव्हतं. तो शो मी कसाबसा केला. कारण लॉकडाउन होतं मला काम हवं होतं. घर माझ्यावर चालत असल्यामुळे मला काम सोडता येत नव्हते. तो पूर्ण सीझन काम केले. त्यावेळी मी सैफी हॉस्पिटलमध्ये डायटिशियन आहेत. त्यांच्याकडून मी व्हिडीओ कॉलवर सहा महिन्यांचा डाएट घेतला. तो मी फॉलो केला. त्याने माझं बऱ्यापैकी वजन कमी होत होते. त्यानंतर शाळेतला माझा मित्र स्वप्नील कदम जो पर्सनल ट्रेनर आहे. त्याची जिम नाही. त्यामुळे माझं घर लहान आहे. शेजाऱ्यांचे घर मोठे असल्यामुळे त्याची परवानगी घेऊन त्याला मला तिथे तू घरात करु शकतो अशा एक्सरसाइज सांगायला सांगितल्या. त्याने महिन्याभरात पाच-सहा सिटिंग्स दिल्या. नियमित वर्कआउट, दररोज चालणे आणि डायटने वजन घटवले आहे.

सहकलाकारांनी 'छक्का' म्हणून हिणवलं

मी एका रिएलिटी शोच्या शूटला गेले. तिथे ज्या महिला कलाकार होतात. त्यांनी मला छक्का म्हणून हिणवलं. छक्का म्हटलं म्हणून मला वाईट वाटलं नाही. पण त्यांची वृत्ती मला आवडली नाही. ते मला नकळतमध्ये हिणवत होते. ते एक स्लोगन होतं. त्यात मी एका बाजूला आणि बाकीच्या एका बाजूला. तर छक्का म्हटलं की त्या सगळ्या जणी माझ्याकडे हात करायच्या. मी सुद्धा सुरुवातीला त्या फ्लोमध्ये आले की अरे व्वा स्लोगन छान आहे वगैरे. पण मग समोरच्यांच्या रिअॅक्शन आणि यांच्या रिअॅक्शन हे पाहून दिवसभर मला असं जाणवून दिलं गेलं की आम्ही तुला छक्का म्हणतोय. 

त्या दिवशी मला खूप त्रास झाला....

त्या दिवशी मला खूप त्रास झाला. त्या दिवशी मी कसंबसं शूट केलं. आधी मी हेल्थसाठी वजन कमी करत होते. पण, त्यानंतर मला जे हिनवलं गेलं, जो द्वेष केला गेला त्यासाठी ठरवलं. मला छक्का म्हणाले याचा राग नाही. कारण, ती शिवी नाही. ते एक जेंडर आहे. तो एक समाज आहे. मुळात ते स्वाभिमानी माणसं आहेत. त्यामुळे मला त्या लोकांचा खरंच मनापासून आदर आहे. म्हणून मला तो शब्द वापरला याचं दु:खं नाही. मात्र, या हिनवणाऱ्यांची जी वृत्ती आहे ना त्याचं मला प्रचंड वाईट वाटल्याचे आरतीने म्हटलं. 

टॅग्स :बिग बॉस मराठी