बाप-लेकीचं नातं छोट्या पडद्यावर पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2017 5:17 PM
छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा बाप लेकीचं नातं उलगडलं जाणार आहे. बाप-लेकीच्या नात्यातील विविध कंगारे रसिकांना अनुभवता येणार आहे. छोट्या ...
छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा बाप लेकीचं नातं उलगडलं जाणार आहे. बाप-लेकीच्या नात्यातील विविध कंगारे रसिकांना अनुभवता येणार आहे. छोट्या पडद्यावरील रसिकांच्या भेटीला मेरी दुर्गा ही नवी मालिका येत आहे. शीर्षकावरुनच ही मालिका दुर्गा नावाची मुलीचे वडील आणि खुद्द दुर्गा यांच्यावर आधारित असल्याचे समजतंय. बाप आणि लेकीचं नाते, पित्याच्या लेकीकडून असलेल्या आशा-अपेक्षा यांचे हळूवार आणि तितकेच भावनिक दर्शन या मालिकेतून घडणार आहे. मेरी दुर्गा या मालिकेत पित्याचा लेकीसाठी, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु असलेला संघर्ष रसिकांना पाहता येणार आहे. यशपाल चौधरी आणि दुर्गा या बाप लेकीच्या नात्याची ही कथा असेल. यातील यशपाल चौधरी हे अनंत अडचणी आणि बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही लेकीच्या शिक्षणासाठी धडपड करतात.मुलगी शिकली, प्रगती झाली यावर यशपाल यांचा विश्वास असून तिला शिकवण्यासाठी अहोरात्र ते झटत असतात. दुर्गाने शिकून नाव कमावावं असं त्यांचे स्वप्न आहे. लेक दुर्गाही वडिलांची मेहनत पाहून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यासात लक्ष घालते. शिक्षणाचा ध्यास घेऊन दुर्गाही तितकीच मेहनत करते. मात्र वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ती यशस्वी ठरते का, अपेक्षांचं ओझं घेऊन शिक्षणावर दुर्गा लक्ष केंद्रीत करु शकते का, दुर्गाच्या भविष्यासाठी यशपाल चौधरी यांचा सुरु असलेला संघर्ष फळाला येणार का यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे या मालिकेतून रसिकांना मिळणार आहेत. या मालिकेत यशपाल चौधरी ही वडिलांची भूमिका विकी अहुजाने साकारली आहे. तर दुर्गाची भूमिका अनन्या अग्रवाल हिने साकारली आहे.