Join us  

निकालाची धाकधूक वाढली! अवघ्या काही तासांमध्ये होईल विजेत्याची घोषणा; कधी-कुठे पाहता येणार 'बिग बॉस १७'चा ग्रॅण्ड फिनाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 2:00 PM

या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे.  तीन महिने उलटले आणि आता महाअंतिम फेरीसाठी अवघे काही तास उरले आहेत. या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.  अवघ्या काही तासात या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. सलमान खानचा हा सुपरहिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17'चा महाअंतिम सोहळा कधी, कुठे आणि कसा पाहता येईल,  हे जाणून घेऊया...

दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. 'बिग बॉस 17' चा ग्रँड फिनाले आज संध्याकाली (28 जानेवारी 2024) प्रसारित होणार आहे. हा ग्रँड फिनाले एक-दोन नाही तर 6 तास चालणार आहे. कलर्स वाहिनीवर संध्याकाळी ६ वाजता फिनाले सुरू होईल. तुम्ही OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर बिग बॉसचे थेट प्रक्षेपण देखील पाहू शकता. 

6 स्पर्धकांना पराभूत करून, टॉप 5 स्पर्धकांनी 'बिग बॉस 17' च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत आपले स्थान बनवले. यामध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मन्नारा चोप्रा (Mannara Chopra), मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि अरुण माशेट्टी (Arun Mashetty) यांचा समावेश आहे. 

दरवर्षी 'बिग बॉस'च्या विजेत्याला काही लाखांचा चेक दिला जातो. या सीझनमध्येही विजेता मालामाल होणार आहे.  'बिग बॉस 17'च्या विजेत्याला 30 ते 40 लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. यासोबत विजेत्याला ट्रॉफीसह एक कार भेट म्हणून मिळेल.बिग बॉस हिंदीच्या महाअंतिम सोहळ्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्साह पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर सध्या बिग बॉसची क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदा बिग बॉस हिंदीचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉसअंकिता लोखंडे