फीफा विश्वचषक 2018 ने आपल्या सर्व क्रेझी चाहत्यांना आपल्या उत्कृष्ट सामन्यांच्या रोमांचक लढतींसह रोखून ठेवले आहे. यातील काही चाहते सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या 'दिल ही तो है' च्या सेटवर दिसले. हि मालिकेतून एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित आहे. असे म्हटले जाते कि “जे कुटुंब एकत्र जेवतात, ते एकत्र राहतात”. शिवा 'दिल ही तो है'चे कुटुंब असे मानते कि जे कुटुंब एकत्र मिळून फुटबॉल बघता ते एकत्र अधिक मजा करतात!
यातील जवळपास सर्वच कलाकार हे फुटबॉलचे चाहते असल्याने शो मधील प्रत्येकजण एकत्र फिफा सामना पाहण्यासाठी प्रेरित झाले. जेव्हा केव्हा शुटींग दरम्यान फ्री टाईम किंवा ब्रेक असतो, तेव्हा शो मधील सर्वजण एकत्र बसून सामने बघतात. अनेकदा हे निदर्शनात आले आहे कि, रित्विक (करण कुंद्रा) त्याचे भाऊ रिषभ (अक्षय डोगरा) आणि शिवम (गौतम अहुजा) यांच्यासोबत फ्री टाईम मध्ये फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा सेटवर सिनसाठी बदल चालू असतो तेव्हा हे तिघे जण सेटवर फुटबॉल खेळण्यात व्यस्त असतात.
करण म्हणाला,“मला फुटबॉल आवडतो आणि मी फिफाचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा ‘दिल ही तो है’ ची पूर्ण टीम फिफा बघत असते तेव्हा सेटवर हा आनंदाचा क्षण असतो. आम्ही आमच्या आवडत्या टीमसाठी चीअर करतो आणि आमचे मित्र जे विरुद्ध टीमचे समर्थक आहेत त्यांना चिडवतो. सामन्यादरम्यान शो मधील सर्व महिला सामना बघण्यात सक्रियतेने सहभाग घेतात आणि त्यांच्या आवडत्या संघासाठी चीअर्स देखील करतात. मला असा वाटते कि, सेट वरील सर्वांवर फिफा फिवर चढला आहे! ”