Join us  

"एवढा जेंटलमॅन बनतोस ना तर...", अभिजीत - अंकितामध्ये उडाला वादाचा भडका, कारण ठरली निक्की?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 9:16 AM

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये घरातले चांगले मित्र अभिजीत-अंकितामध्ये नवीन वाद निर्माण झालाय (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीचा आजपासून दहावा आणि शेवटचा आठवडा सुरु झालाय. या आठवड्याच्या शेवटी बिग बॉस मराठीची ग्रँड फिनाले रंगणार आहे. रितेश देशमुख गेले दोन्ही आठवडे बिग बॉस मराठीच्या 'भाऊचा धक्का'वर शनिवार - रविवार दिसला नाही. शूटींगनिमित्ताने बाहेर असल्याने रितेश देशमुखने बिग बॉस मराठीच्या होस्टिंगमधून ब्रेक घेतला होता. अशातच आज शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरातील एकमेकांचे खास मित्र अभिजीत-अंकितामध्ये वादाची ठिणगी उडाली आहे.

ड्यूटीवरुन अंकिता-अभिजीतमध्ये नवीन वाद

बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोत अंकिता-अभिजीतमध्ये ड्यूटीवरुन चांगलाच वाद रंगला आहे. अंकिता बाल्कनीमध्ये बसलेली असते. तर अभिजीत निक्कीसोबत गार्डन एरियामध्ये असतो. तेव्हा अंकिता अभिजीतला म्हणते, "तिला डायनिंग देऊन अख्खं संडास-बाथरुम तू स्वतःवरती घेतोयस." पुढे अभिजीत अंकिताला म्हणतो, "तुला वाटतंय ना जर तुझ्या ड्यूटी जास्त आहेत तर तिला बोल ना."

दोघांचा वाद निक्की शांतपणे पाहत असते. पुढे अंकिता अभिजीतला म्हणते, "सगळीकडे तू जेंटलमॅन बनून येतोस तर ये ना इथेही जेंटलमॅन बनून." हे ऐकताच अभिजीत चिडतो आणि जागेवरुन उठतो. तो अंकिता आणि सर्वांना म्हणतो, "मी माझी ड्यूटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतलीय. तर त्यामध्ये मी चुकीचं काय आहे." पुढे अंकिता जोरात अभिजीतवर किंचाळते. अशाप्रकारे अंकिता-अभिजीतमध्ये चांगलाच वाद निर्माण झालेला दिसला. या वादाचं कारण निक्की असल्याची दाट शक्यता आहे. आता नेमकं काय झालंय हे आजच्या भागात पाहायला  मिळेल.

टॅग्स :बिग बॉस मराठीकलर्स मराठीअंकिता प्रभू वालावलकरअभिजीत सावंत