Join us

अखेर 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमच्या लेकीनं रिलेशनशीपच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 1:49 PM

Chala Hawa Yeu Dya Fame Bhau Kadam's Daughter Mrunmayee Kadam: 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदमची मुलगी मृण्मयीने तिच्या वाढदिवसादिवशी रिंग फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिच्या रिलेशनशीपच्या चर्चेला उधाण आले होते.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या शोमधून विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam) घराघरात पोहचला आहे. भाऊ कदमने आपल्या कौशल्याच्या जोरावर मराठी सिनेइंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केले आहे. भाऊ कदमची लेक मृण्मयी कदम(Mrunmayee Kadam)ने अद्याप सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकलं नसलं तरी ती सतत चर्चेत येत असते. दरम्यान नुकताच तिने तिचा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने फोटोशूट केले. त्यातील एका फोटोत तिने तिची रिंग फ्लॉन्ट केली. त्यानंतर ती आदित्य नामक तरूणाला डेट करत असल्याच्या चर्चेनं जोर धरला.  मात्र आता तिने या चर्चांवर मौन सोडले आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत याबाबतचा खुलासा केला आहे.

मृण्मयी कदमने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, माझ्या सर्व मंडळींना! तुम्ही माझा प्रवास पाहिला आहात. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. आदित्य आणि मी एकमेकांना गेल्या ६-७ वर्षांपासून ओळखतो. आम्ही बालपणापासून एकाच शाळेत शिकत होतो. पण मला आता याबाबत बोलावं लागत आहे. फक्त आदित्यबद्दलच नाही तर आम्ही फॅमिली आहोत. त्याची आई आणि माझी फॅमिली खूप क्लोज आहे. त्याला तुम्ही माझ्या व्लॉग्स, स्टोरीमध्ये पाहिले असेल. आम्ही आमच्या कुटुंबासोबत एकत्र फिरायला जातो. याशिवाय आमच्यात काहीच नाही. 

मृण्मयीने आणखी एक पोस्ट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. त्यात तिने रिंगवाला फोटोही शेअर केला. तिने पोस्टमध्ये म्हटले की, मी आराध्यला त्याचा हात माझ्या हातात द्यायला सांगितला आणि पोझ दिली. ज्यांना सर्व माहित आहे. हे वृत्त पाहून मी खूप डिस्ट्रब झाले. मी सर्वकाही शेअर करते. यात कुठेतरी माझंच चुकत आहे. मला हे क्लिअर करायचे आहे आणि याबाबत खुलासा करायचा आहे. मला कुणीच प्रपोझ केले नाही. मी लवकर लग्न वगैरे करणार नाही आहे. याच कारणांमुळे मी दररोज व्लॉगिंग करत नाही. लोकांना कॉन्ट्रोव्हर्सी करायची सवय आहे. पण यामुळे खूप त्रास होतो. आता मी त्याचा सामना केला आहे.

तसेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर मला फोटो काढायला आवडतात. वेगवेगळ्या पोझ द्यायला आवडतात. हे तुम्हाला माझ्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहित असेल. हो आणि रिंग फ्लॉन्ट केली, ती माझी आवडती पोझ आहे. मला ही रिंग श्वेता आंब्रे यांनी दिली आहे. मला आदित्यच्या आईने वाढदिवसाला रिंग गिफ्ट दिली. कारण मला रिंग घालायला खूप आवडते. हा फोटो आदित्यने क्लिक केलेला नाही. त्याच्या आईने काढला असल्याचे सांगितले.

तिने पुढे म्हटले की, मी, माझी आई आणि आदित्य व त्याची आई आणि आराध्य आमच्यासोबत अलिबागला आले होते. ही प्रपोझल ट्रीप नव्हती. तिथे आम्ही का गेलो होतो, हे मी काही महिन्यांपर्यंत सांगू शकत नाही. जे गोपनीय आहे. मी तुम्हा सर्वांसाठी व्लॉग करते. त्यामुळे तुम्ही एन्जॉय करा. पण आता मी माझ्या व्लॉगमध्ये त्याला घ्यायचे की नाही, याचा विचार करते आहे. मी २१ वर्षांची आहे. माझी खूप स्वप्नं पूर्ण करायची आहेत. माझा लग्नावर विश्वास नाही. मात्र काही मुद्द्यांना लक्षात घेऊन विचार करेन. पण आता नाही.

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या