बिग बॉस १७चा अंतिम सोहळा उद्या म्हणजे रविवारी २८ जानेवारीला पार पडणार आहे. या शोचे टॉप ५ फायनलिस्ट अंकिता लोखंडे, मुनावर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण मशेट्टी हे ट्रॉफी जिंकण्यासाठी एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. याआधी सर्वांनी फिनालेसाठी परफॉर्मन्सची तयारीही केली आहे. मात्र, ट्रॉफी पाहून चाहते कमालीचे उत्साहित झाले आहेत.
बिग बॉस १७ची ट्रॉफी पूर्णपणे 'दिल दिमाग, दम' या शोची थीम लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. तिची रचना तीन खोल्या आणि बिग बॉसच्या घराचे सार दर्शवते. हे केवळ शीर्ष अंतिम स्पर्धकांमध्ये सर्वाधिक मते मिळविणाऱ्या व्यक्तीला दिले जाईल. 'बिग बॉस १७'च्या या सीझनची बक्षीस रक्कम ३० ते ४० लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे आणि विजेत्याला एक कार देखील मिळेल. निकाल २८ जानेवारी रोजी ग्रँड फिनालेच्या रात्री घोषित केला जाईल. फिनालेमध्ये खूप नाट्य रंगणार आहे. पण दरम्यान, जुन्या स्पर्धकांचे डान्स नंबरही पाहायला मिळतील, ज्याची झलक प्रोमोमध्ये समोर आली आहे.
स्पर्धकांचे समर्थक येणार घरातआजच्या एपिसोडमध्ये भावना शिगेला पोहोचतील कारण इंडस्ट्रीतील काही खास पाहुणे स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी शोमध्ये येणार आहेत, त्यामुळे हा भाग खूपच भावूक होणार आहे. याचा प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये मुनावर फारुकी, अंकिता लोखंडे यांना करण कुंद्रा आणि अमृता खानविलकर यांना पाठिंबा देण्यासाठी आल्याचे पाहायला मिळाले. करण मुनव्वरसाठी आला होता, तर अमृता अंकितासाठी बिग बॉस १७मध्ये आली होती. दोघांनीही आपल्या मित्रांना मिठी मारली आणि खूप रडले.
'बिग बॉस १७' ग्रँड फिनालेची तारीख, वेळ, मतदान'बिग बॉस १७'चा ग्रँड फिनाले २८ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. हा फिनाले कलर्स चॅनलवर टीव्हीवर आणि इंटरनेटद्वारे जिओ सिनेमा ॲपवरही पाहू शकता. ॲपवरच मतदान करण्याचा पर्यायही मिळेल.