सध्या सर्वत्र 'बिग बॉस सीझन 17' ची चर्चा पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बिग बॉसचा खेळ रंजक होत चालल्याचं दिसतंय. एकीकडे प्रेक्षक आता हा नवा सिझन पाहण्यासाठी उत्सुक आहे. तर दुसरीकडे बिग बॉसच्या घरात राडे सुरु झाले आहेत. तर चाहते या शोचा पुरेपूर आनंद घेत आहेत.
'दिल', 'दिमाग' आणि 'दम' या घरात विभागलेल्या स्पर्धकांमध्ये भांडणं सुरू झाली आहेत. लाईव्ह फीडमध्ये दिसते की फिरोजा खान, रिंकू धवन आणि जिग्नेश व्होरा नाश्ता बनवत आहेत. फिरोजा ही पोहे बनवत होती. यावेळी रिंकूकडे मदत मागितली. तेव्हा 'हा टास्क आहे. टास्क पुर्ण करता येत नसेल तर तो घेऊ नये', असे म्हणत तिने मदत करण्यास नकार दिला. यानंतर त्यांच्यात भांडणं लागलं. भांडण पाहून घरातील इतर सदस्यही संतापले. सना रईस, सनी आर्या आणि अरुण यांनी नाश्ता करण्यास नकार दिला. बिग बॉसच्या घरातील भांडणे पाहता नेहमीप्रमाणे यावेळी देखील हा शो धमाकेदार ठरणार हे दिसत आहे.
'बिग बॉस 17'ची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. कलर्स टीव्ही आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा वादग्रस्त कार्यक्रम पाहता येईल. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता आणि वीकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. घरातील स्पर्धक कशाप्रकारे घरात वावरतात आणि एकमेकांसोबत कसे वागतात , किती वाद होतात हे सगळं पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.