सारेगमप लिटल चॅम्पस(Sa Re Ga Ma Pa Little Champs)च्या पहिल्या पर्वातून प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) हे स्पर्धक घराघरात पोहचले. नुकतेच या दोघांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत प्रेमाच्या नात्याची जाहीर कबुली दिली. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोशल मीडियावरून या दोघांवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रथमेश आणि मुग्धा यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.
मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेची पहिली भेट सारेगमप लिटिल चॅम्प्स मराठीमुळेच झाली आणि शोनंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रमही झाले. या शोदरम्यान दोघांच्या भेटीगाठी व्हायच्या. दोघांमध्ये चांगली मैत्रीदेखील झाली होती आणि कालांतराने दोघांच्या मनात एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. एकदा कार्यक्रमाची तालीम सुरु असताना दोघांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केले. प्रथमेश कधी ना कधी प्रपोज करणार असल्याची जाणीव मुग्धाला झाली होती. आपल्या प्रपोजलला मुग्धा काय उत्तर देणार, हेसुद्धा प्रथमेशला माहीत होते. मात्र तरीदेखील तिने होकार द्यायला तीन-चार दिवसांचा कालावधी घेतला.
४ वर्षांपासून करताहेत एकमेकांना डेट
अखेर एकेदिवशी मुग्धाने प्रथमेशला भेटायला बोलावले आणि आपले उत्तर होकारार्थी असल्याचे सांगितले. जवळपास गेल्या चार वर्षांपासून प्रथमेश आणि मुग्धा एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या रिलेशनशीपबद्दल कुटुंबीयांना माहित होते. मुग्धाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी सांगायचे असे त्यांनी ठरवले होते. अखेर ठरवून दोघांनी एकाच वेळी आपापल्या कुटुंबीयांना सांगितले. सारेगमप लिटिल चॅम्प्सपासून सुरु झालेला या दोघांचा प्रवास आता रिलेशनशीप पर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.