Join us  

फर्स्ट प्रायोरिटी फॅमिली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2016 10:03 AM

                                      ...

                                          पैसा तो हर कोई कमा लेता है,                              लेकिन खुशनसीब होते हैं जो परिवार कमा लेते हैं.आजकालच्या धावत्या युगात माणूस हा पैशाच्या मागे पळत असल्यामुळे माणसाला आज स्वत:च्याच माणसांसाठी वेळ नसल्याचे दिसत आहे. पण आपल्या या ग्लॅमर दुनियेतील मराठी इंडस्ट्रीचे कलाकार इतके नाव, पैसा, प्रसिद्धी असूनदेखील आपल्या फॅमिलीला नेहमीच आयुष्यात प्रथम प्रायोरिटी देतात. फॅमिली म्हणजे आपला श्वास असतो. त्यांचा विश्वास, त्यांची साथ कधीच सुटता कामा नये. नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल फॅमिली डे निमित्त मराठी कलाकारांनी आजच्या तरूणांना लोकमत सीएनएक्सच्या माध्ममातून  दिलेला संदेश. १.चिन्मय उदगीरकर: आई, बाबा, भाऊ,वहिनी व माझी बायको अशी माझी फॅमिली आहे. पण भाऊ कामानिमित्त पुण्यात असतो. पण आमचा पूर्ण परिवार महिन्यातून एकदा तरी आमच्या गावी म्हणजेच नाशिकला भेटतो. फॅमिली है तो जिंदगी है. तसेच माझ्या फॅमिली सारखाच माझी काळजी घेणारा सुनिलदेखील मला भावासारखाच आहे. म्हणून आजच्या तरूणांना एवढेच म्हणेल की, फॅमिलीसहित सर्व नात्यासंबंधांचा रिसेपेक्ट करा. फॅमिली हा परिपूर्ण विकासाचा व माणूस म्हणून जगण्याचा गाभा असतो. म्हणूच जगात कुटूंबव्यवस्था ही भारताला मिळालेली देणगी आहे. शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचलो की, टाळया वाजवायला आपली माणसेच असणं हा एक जगण्याचा हक्कच पाहिजे. २. सायली संजीव : माझी फॅमिली हे देवाने मला दिलेला खूप मोठा आशिर्वाद आहे. माझ्या परिवारात आई, बाबा, एक मोठा भाऊ असतो. वडिल तहसीलदार आहे. पण तरी ही त्यांनी आमच्या दोघांवर कधी ही करिअरबाबतीत कोणताही दबाव आणला नाही. फक्त त्यांच एवढेच म्हणणे असते की, जे काही करिअर करायचं ते सांगून करा. तसेच वडिल कर्ते आहेत म्हणून त्यांनी त्यांचे निर्णय आमच्यावर कधीही लादले नाही. तर ते नेहमीच सर्वाच्या विचारांचा आदर करतात. आय लव्ह माय फॅमिली. त्याचबरोबर फॅमिली डे साठी एवढेच सांगेल की, आई-वडिलांशी नेहमी प्रामाणिक राहा. त्यांना वाईट वाटेल असे काहीही करू नका. फॅमिली हा आयुष्याचा खूप मोठा सपोर्ट असतो. 3. सुयश टिळक: आयुष्यात कोणीच एकटा राहू शकत नाही. सर्वासाठी फॅमिली खूप महत्वाची आहे. आय लव्ह माय फॅमिली. माझ्या फॅमिलीमध्ये आई, बाबा, एक बहिण आहे. ते पुण्यात असतात. तसा माझा परिवार खूप मोठा आहे. आत्या, मामा, मावशी, काका सहित मी ज्यांच्यासोबत काम करतो यांनादेखील माझ्या परिवाराचे सदस्यच मानतो. फॅमिली डे निमित्त मी परिवाराला इतकेच म्हणेल की, थॅक्स आई-बाबा त्यांनी माझ्यातील कला जाणून माझ्या करियरचा स्वीकार केला. तसेच मी माझ्या फॅमिलीसोबतचा घालविलेला प्रत्येक वेळ हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.४. प्रमिती नरके: तू माझा सांगती या मालिकेतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी प्रमिती म्हणते, मी माझ्या आई बाबांची एकुलती एक लाडकी कन्या आहे. माझ्या बाबा कामाच्या निमित्ताने सतत बाहेर असतात.पण फॅमिलीसाठी जितका वेळ मिळेल तितका वेळ त्यांच्यासोबत स्पेड करायचा हा त्यांचा कटाक्ष असायचा. त्यासाठी आम्ही वर्षातून तीन वेळा ट्रीपदेखील काढायचो. तसेच फॅमिली डे साठी बद्दल म्हणायचे तर, आपल्यावर किती ही मोेठे संकट आले तरी आपल्यासोबत आपली फॅमिलीच उपस्थित असते. त्यामुळे आपल्या रोजच्या रूटीनमधून एक दिवस तरी फॅमिलीबरोबर घालविणे हा नियमच स्वत:ला घालून ठेवला पाहिजे. ५. अक्षर कोठारी: मी मुळचा सोलापूरचा आहे. माझ्या परिवारात आई, वडिल, लहान भाऊ, बायको आम्ही पाच जण असतो. पण माझी आजी ही माझ्या सगळ््यात जवळची व्यक्ती होती. पण ती काही वर्षापूर्वीच आम्हाला सोडून गेली. पण तिची जागा आता माझ्या बायकोने भरून काढली आहे. कारण ती माझी आजीसारखीच काळजी घेते. त्यामुळे माझे लग्न हे माझ्या अविस्मरणीय. तसेच फॅमिली डे निमित्त म्हणाल तर, फॅमिली म्हणजे आई-वडिल, भाऊ-बहिणच नसतात. तर तुम्ही कामाच्या निमित्त जिथे ही जाव लागेल तेथील माणसेदेखील परिवारातील सदस्यासारखीच असतात. मी दोन प्रॉडक्शनसोबत काम करतो. हे दोन्ही ही माझ्यासाठी फॅमिली सदस्यांसारखेच आहे.६. जुही गडकरी: पुढचं पाऊल या मालिकेतून सगळ््यांना आपलेसे करून घेतलेली जुही म्हणते मी एका जॉइंड फॅमिलीमधून पुढे आले आहे. काका, आत्या आम्ही सर्व एकत्रित कर्जतला राहतो. मोठी फॅमिली असल्यामुळे खूप एन्जॉय करतो. तसेच कुत्री, मांजरी, पक्षी हे देखील आमच्या गडकरी परिवाराचे सदस्य आहेत. आज जरी आमच्या घरातील काही लोक कामानिमित्त बाहेर असले तरी, सण-उत्सवादिवशी एकत्र येऊन खूप धम्माल करतो. त्यामुळे फॅमिली ही माझ्यासाठी पहिली प्रायोरिटी आहे.तसेच इतर मुलांना हे सांगते, की आयुष्यात किती ही मोठे झाला तरी फॅमिली पहिली प्रायोरिटी असलीच पाहिजे. तसेच त्यांचा विश्वास हा कधीच मोडणार नाही याची काळजी देखील घेतली पाहिजे.