'सेटवर पहिले कामास प्राधान्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 5:58 PM
बेनझीर जमादारदिल की नजरसे खूबसूरत, फिर भी ना माने बदतमीज दिल, मेरी सासू माँ अशा अनेक हिंदी मालिकेतून ...
बेनझीर जमादारदिल की नजरसे खूबसूरत, फिर भी ना माने बदतमीज दिल, मेरी सासू माँ अशा अनेक हिंदी मालिकेतून पर्ल व्ही पुरी हा अभिनेता प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता सध्या तो नागार्जुन एक योध्दा या मालिकेतून दिसतो आहे. ही मालिका करताना आलेले अनुभव, त्याचप्रमाणे भविष्यातील त्याचे प्लॅन या अनुषंगाने अभिनेता पर्ल व्ही. पुरीने लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद 1. या मालिकेविषयी काही सांगशील?- प्रेक्षकांसाठी ही खूपच मनोरंजक मालिका आहे. या मालिकेत मी सुपरहिरोची भूमिका साकारत असल्याने खूपच छान वाटतं आहे. या मालिकेचा मला वेगळा अनुभवदेखील मिळतोय. सेटवर मला रोज खूप काही नवीन शिकण्यास मिळते. एक कलाकार म्हणून सुपरहिरोची भूमिका खूपच एन्जॉ़य करतो आहे. 2. या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान तू आजारी पडला होता. एक कलाकार म्हणून तू आरोग्य आणि काम कसे सांभाळतो?- खरं सांगू का, टीव्ही शो करताना रोज बारा ते अठरा तास कलाकारांना काम करावे लागत असते. त्यामुळे प्रत्येकासाठी आरोग्य सांभाळणे ही खूप अवघड गोष्ट असते. याचा अर्थ असा नाही की, मी कामाला दोष देतोय. मी इथे काम करायलाच आलो आहे, तेच करीत आहे. त्याचबरोबर या क्षेत्राचा मी पुरेपूर आनंददेखील घेतोय.3. तू अभिनयाव्यतिरिक्त लिखाणही करतो. त्याविषयी काय सांगशील?- हो, लेखन करण्यास मला फार आवडतं. मी खूप दिवसांपासून लिखाण करतो आहे. त्याचबरोबर गाणं मला फार आवडते. लवकरच मी एक सिंगल साँग करणार आहे. माझ्या चाहत्यांसाठी हे एक सरप्राईज असणार आहे. माझे सिंगल साँन्ग हे लवकर प्रदर्शितदेखील होणार आहे.4. प्रेक्षकांना तू बॉलिवूडमध्ये कधी दिसणार आहेस?- खरचं माझ्या चाहत्यांसाठी हे सरप्राईज असणार आहे. मी स्वत:देखील बॉलिवूडमध्ये येण्यास उत्साही आहे. मात्र, सध्या काही बोलणी सुरू आहेत. जर चाहत्यांनी मनापासून प्रार्थना केली तर नक्कीच मी लवकरच रूपेरी पडदयावर दिसेल.5. तू सेटवर सहकलाकारांशी फार कमी संवाद करतो, याविषयी काय सांगशील?- मी एक प्रोफेशनल कलाकार आहे. सेटवर काम करण्यास येतो, तेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. पहिले कामाला प्राधान्य त्यानंतर मस्ती जर मी मित्रांसोबत फिरण्यास गेलो तर तिथे मौज, मजा, मस्ती करत असतो. मात्र, कामाच्या ठिकाणी झोकून देवून काम करण्याचा माझा प्रयत्न असतो.