Join us  

'या एका कारणामुळे हेमांगीला लागली तब्बल १६ तास झोप'; सांगितला संघर्षाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 3:25 PM

Hemangi kavi: अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत ग्लॅमरस लाइफ जगणाऱ्या कलाकाराला खऱ्या आयुष्यात किती संघर्ष करावा लागतो हे सांगितलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाइफसह पर्सनल लाइफमधील काही किस्से, घटनाही शेअर करत असते. हेमांगीने कोणतीही नवी पोस्ट केली की ती वाऱ्यासारखी व्हायरल होते. यात अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत ग्लॅमरस लाइफ जगणाऱ्या कलाकाराला खऱ्या आयुष्यात किती संघर्ष करावा लागतो हे सांगितलं आहे.

सतत पडद्यावर वावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. यात अनेक दौरे, कार्यक्रम, प्रमोशन, शुटिंग या सगळ्याची धावपळ सुरु असते. त्यामुळे कलाकारांची कायम धावपळ सुरु असते. यात बऱ्याचदा त्यांना पुरेशी झोपही घेता येत नाही. म्हणूनच या हेक्टिक शेड्युलमधून स्वत:साठी कसा वेळ काढावा हे तिने सांगितलं आहे.

"बऱ्याच दिवसांपासून कामानिमित्त बरीच धावपळ, प्रवास चालू होता, झोपेचं खोबरं झालं होतं. काल लवकर pack up झाल्यामुळे व्यवस्थित झोपायला मिळालं आणि मी ही घोडे बेचके झोपून गेले, 16 तास. झोपेचा backlog भरून काढल्यासारखं झालं. आज उठल्यावर इतकं कमाल वाटत होतं. मन, डोकं सगळं थार्यावर असल्यासारखं. Energy revive झाली आणि कोऱ्या पाटीने पुन्हा कामाला सुरुवात.आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ कारण झोपच आहे याचा साक्षात्कार झाला!", असं हेमांगीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, हेमांगीच्या या पोस्टमधून दैनंदिन जीवनात कलाकारांना किती स्ट्रगल करावा लागतो हे स्पष्टपणे दिसून येत आहे. तसंच तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक मालिकांमध्ये झळकलेली हेमांगी सध्या 'लेक माझी दुर्गा' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

टॅग्स :हेमांगी कवीटेलिव्हिजनसेलिब्रिटी