'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma Serial) मालिकेतून दयाबेन अनेक वर्षांपासून गायब आहे. दिशा वकानी (Disha Vakani), जिने असित मोदींच्या शोमध्ये दयाबेन आयकॉनिक पात्र साकारून लोकांची मने जिंकली. लग्नानंतर ती २०१८ मध्ये प्रसूती रजेवर गेली आणि तेव्हापासून ती परतली नाही. आता अशी माहिती मिळते आहे की, दिशा वकानी मालिकेत परतणार नाही आहे आणि निर्मात्यांना नवीन दयाबेन मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वी, असित मोदींनी न्यूज १८ शोमध्ये दिशा मालिकेत परतणार नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता लेटेस्ट माहिती मिळाली आहे की दिशा वकानी शोमधून बाहेर पडली आहे आणि निर्मात्यांना एक नवीन दयाबेन मिळाली आहे. मालिकेत्या संबंधित एका सूत्राने न्यूज १८ ला सांगितले की, दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन देत असलेल्या अभिनेत्रींपैकी अखेर एकीची निवड करण्यात आली आहे. मात्र, अभिनेत्रीची ओळख अद्याप समोर आलेली नाही. एवढेच नाही तर टीम सध्या तिच्यासोबत मॉक शूटही करत आहे.
एक आठवड्यापासून नवीन दयाबेन करतेय शूटिंग सूत्रांनी सांगितले की, हो. हे खरंय. असित मोदी नवीन दयाबेन शोध घेत होते आणि नुकतेच त्यांना एका ऑडिशनने खूप इंप्रेस केले. सध्या तिच्यासोबत मॉक शूट सुरू आहे. ती जवळपास एका आठवड्यापासून टीमसोबत शूट करत आहे. या वर्षी जानेवारीमध्ये, न्यूज १८ ला दिलेल्या एका खास मुलाखतीत असित मोदी यांनी दिशा वकानी शोमध्ये परत येणार नसल्याचे सांगितले. तिने सांगितले की ती सध्या तिच्या दोन मुलांमध्ये व्यस्त आहे. असित मोदी म्हणाले होते, 'मी अजूनही प्रयत्न करत आहे. मला वाटते की दिशा वकानी परत येऊ शकत नाही. तिला दोन मुले आहेत. ती माझ्या बहिणीसारखी आहे. आजही तिच्या कुटुंबाशी आमचे खूप जवळचे नाते आहे. दिशा वकानी हिने मला राखी बांधली आहे. तिचे वडील आणि भाऊही माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. जेव्हा तुम्ही १७ वर्षे एकत्र काम करता आणि ते तुमचे विस्तारित कुटुंब बनते.
''नवीन दयाबेन आणावी लागेल''याच मुलाखतीत ते पुढे म्हणाले, 'तिच्यासाठी शोमध्ये परतणे कठीण आहे. लग्नानंतर महिलांचे जीवन बदलते. लहान मुलांसोबत काम करणं आणि घर सांभाळणं. खरेतर त्यांच्यासाठी थोडं कठीण असतं. पण तरीही मी सकारात्मक आहे. कुठेतरी देव चमत्कार करेल आणि ती परत येईल असे वाटते. ती आली तर चांगली गोष्ट होईल. काही कारणास्तव ती आली नाही तर शोसाठी मला दुसरी दयाबेन आणावी लागेल.