Join us  

'फ्रेंडस ' सातासमुद्रापलीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2016 8:02 AM

मराठी इंडस्ट्रीचा सुपरहिरो स्वप्नील जोशी, सचित पाटील व गौरी नलावडे या कलाकारांचा काही दिवसापूर्वी  'फ्रेंडस ' हा चित्रपट महाराष्ट्रात बॉक्सआॅफिसवर ...

मराठी इंडस्ट्रीचा सुपरहिरो स्वप्नील जोशी, सचित पाटील व गौरी नलावडे या कलाकारांचा काही दिवसापूर्वी  'फ्रेंडस ' हा चित्रपट महाराष्ट्रात बॉक्सआॅफिसवर सुपरहिट ठरला होता. पण, आता याच चित्रपटाने सातासमुद्रापलीकडे उडी मारलेली दिसते. आर. माधेश दिग्दर्शित  'फ्रेंडस ' हा चित्रपट अमेरिकेमध्ये लॉस एंजल्स,कोलंबस, चिकागो यासारख्या ड्रीम सिटीच्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा टाइम शेडयुल्ड स्वप्नील जोशी न इतर कलाकारांनी सोशलवेबसाइटवर शेअर केला आहे. यामुळे खरंच, महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी ही गोष्ट आहे. चला, तर मग मराठी इंडस्ट्रीच्या या प्रगतीच्या पाऊलाला शुभेच्या देउयात. }}}}