Join us

गबरूः हिपहॉप के शहजादेमध्ये दिसणार अमोल पराशर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:03 AM

गुणी अभिनेता अमोल पराशरने आपल्या असाधारण प्रदर्शनासह लाखों तरूण प्रेक्षकांचे मन जिंकले असून आता डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील आगामी मालिका ...

गुणी अभिनेता अमोल पराशरने आपल्या असाधारण प्रदर्शनासह लाखों तरूण प्रेक्षकांचे मन जिंकले असून आता डिस्कव्हरी जीत वाहिनीवरील आगामी मालिका गबरूः हिपहॉप के शहजादे ह्या मालिकेतून तो हिंदी टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. गबरूः हिपहॉप के शहजादे या मालिकेत अमोल नायक एमसी मनी हा रॅपरची भूमिका करत आहे. स्टिल अॅन्ड स्टिल मूव्हीज्‌ पिक्चर्स निर्मित ह्या शोमध्ये नाट्‌य, प्रणय आणि संगीताचा मिलाफ पाहायला मिळेल.ह्या अभिनेत्याचे समर्पण आणि उत्कट आवड यांमुळे ह्या शोचे निर्माते खुश आहेत. अमोलच्या व्यक्तिरेखेच्या अंगावर २० टॅटूज असून तो परफेक्ट लूक मिळवण्यासाठी हा अभिनेता चित्रीकरणासाठी तयार होण्यासाठी दररोज जवळजवळ तीन तास तयारी करतो. सेटवरील सूत्रांनी सांगितले की अमोल लवकर येतो आणि अतिशय सहनशीलतेने परफेक्ट लूकसाठी तयारी करतो. खरं तर जोपर्यंत त्याला वाटत नाही की त्याचा लूक परफेक्ट आहे तो थांबत नाही. जर तो खुश नसेल तर तो तयारी करतच राहतो. त्यामुळे अमोल पराशर हा हिंदी टेलिव्हिजन उद्योगातील परफेक्शनिस्ट मानला जात आहे.ह्याबद्दल अमोल म्हणाला, “डिस्कव्हरी जीतचा शो गबरूः हिपहॉप के शहजादेचा हिस्सा बनताना मला खूप छान वाटतंय. यात मी एका रॅपरची भूमिका निभावत आहे. होय, खरं आहे की रोज मला तयार व्हायला ३ तास लागतात कारण माझ्यावर अंगावर रोज २० तात्पुरते टॅटू बनवायचे असतात. ती प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे पण मी त्यासाठी तयार आहे. एक अभिनेता म्हणून परफेक्ट लूकमध्ये सर्वोत्तम शॉट देणे हे माझे कर्तव्य आहे. माझी व्यक्तिरेखा दिसायला चांगलीच दिसायला हवी आणि तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायला हवे असे मला वाटते. मला आशा आहे की प्रेक्षकांना हा शो आवडेल आणि आम्ही ह्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांचे ते कौतुक करतील.”