Join us

गणेश आचार्यने एकावेळी खालल्या होत्या २०० इडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 7:02 AM

सुपर डान्सर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...

सुपर डान्सर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या सिझनमधील चिमुकले स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणता स्पर्धक या कार्यक्रमात बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसोबत गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमात प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यने नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तो सेेलिब्रेटी परीक्षक म्हणून आला होता. गणेश आचार्यचे वजन २०१५ च्या सुमारास जवळजवळ २०० किलोच्या घरात गेले होते. त्यामुळे त्याच्या वाढत्या वजनामुळे तो  चांगलाच टेन्शन मध्ये आला होता. त्यामुळे त्याने अवघ्या वर्षभरात ८५ किलो वजन कमी केले. गणेशला खाण्याचे लहानपणापासूनच प्रचंड वेड आहे. त्याच्या समोर एखादा टेस्टी पदार्थ आला की, तो त्याच्यावर ताव माराल्याशिवाय राहू शकत नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण एकदा गणेशने चक्क २०० इडल्या खालल्या होत्या. त्याच्या बहिणीनेच ही गोष्ट सुपर डान्सर या कार्यक्रमात सांगितली. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गणेश लहान असताना त्याच्या एका मित्राने त्याला एक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी त्याने चक्क २०० इडल्या खालल्या होत्या. गणेशला लहानपणापासूनच खाण्याची खूप आवड होती. त्यामुळे त्याच्या मित्राने त्याला इडली खाण्याचे आव्हान दिले. गणेशने देखील हे आव्हान लगेचच स्वीकारले. गणेश काय जास्त इडल्या खाऊ शकत नाही असे त्याच्या मित्राला वाटले होते. पण गणेशने चक्क २०० इडल्या खालल्या. गणेशने इतक्या इडल्या खाल्यानंतर त्याच्या मित्राला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याचा मित्र तर या स्पर्धेत केवळ बाराच इडल्या खाऊ शकला होता. त्यामुळे गणेश ही स्पर्धा जिंकला होता. इडल्यांची ही संख्या पाहाता गणेशच्या घरातल्यांना देखील आश्चर्य वाटले होते. गणेशचा हा लहानपणीचा किस्सा ऐकून सुपर डान्सरच्या सेटवर देखील सगळेच चकित झाले. Also Read : बॅकग्राउंड डान्सर असलेल्या डेजी शहासाठी सलमान खानने उघडले बॉलिवूडचे दरवाजे!