Join us

'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अनुरीता झाची 'परिवार' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 22:22 IST

अनुरीता झा परिवार सीरिजमध्ये मंजूची भूमिका साकारते आहे.

अनुरीता झा तिच्या गॅंग्स ऑफ वासेपूर चित्रपटातल्या भूमिकेबद्दल ओळखली जाते. मिथिला मखान, भारत आणि आश्रममध्येही ती दिसली होती. आता ती परिवार या सीरिजमध्ये दिसणार आहे. परिवार एक भारतीय विनोदी मालिका आहे. सागर बल्लारी यांनी मालिकेचे दिग्दर्शन केलेले आहे आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर परिवार सीरिस लॉन्च झाली आहे. 

परिवार सीरिजमध्ये मंजूची भूमिका साकारत असलेल्या अनुरीता झा शी गप्पा मारताना तिने आपले अनुभव सांगितले, “या मालिकेत विजय राझ, रणवीर शोरी आणि यशपाल शर्मा यांसारख्या कसलेल्या कलाकारांना इम्प्रोवाईझ करताना पाहणे हा माझ्यासाठी एक शिकण्याचा भाग होता. एखादे दृश्य ते खूप वेगळ्या पातळीवर घेऊन जातात आणि तरीही प्रत्येकाची ते दृश्य करण्याची अनोखी शैली आहे. ज्या गोष्टीमुळे मी सगळ्यात जास्त भारावून गेले, ती म्हणजे यशपाल शर्माची कामाबद्दलची निष्ठा. त्याचा शॉट झाल्यावर देखील तो उभा राहून क्यू देतो. या सर्व अफलातून कलाकारांना सलाम! त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले.”

वडील मृत्यूशय्येवर पडल्यानंतर मालमत्तेवरून झालेला विवाद’ या मध्यवर्ती कल्पनेभोवती ही मालिका गुंफली आहे. या मालिकेत काही अप्रतिम कलाकार काम करत आहेत, जसे की, गजराज राव, रणवीर शोरी, यशपाल शर्मा, अनुरीता झा, विजय राझ, सादिया सिद्दिकी आणि निधी सिंह.

यापूर्वी आश्रम सारख्या प्रख्यात मालिकेत भूमिका करणार्‍या अनुरीता झा च्या भविष्यातही आणखी काही मालिका येत आहेत.