Join us  

शूटींग चालू असतानाच kkk 14 मध्ये गश्मीर महाजनी - शालीन भानोतमध्ये धक्काबुक्की, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 10:39 AM

रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी १४ मध्ये मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सहभागी आहे. यावेळी गश्मीरची हिंदी अभिनेत्यासोबत मारामारी झालेली दिसली

'खतरो के खिलाडी'चा १४ वा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'खतरो के खिलाडी' अर्थात KKK 14 सध्या चांगलाच गाजतोय. या सीझनमध्ये मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी सहभागी आहे. या सीझनमध्ये अनेक राडे झाले. परंतु गश्मीरचा कोणताही वाद समोर आला नव्हता. गश्मीर त्याचे स्टंट चांगले परफॉर्म करुन तो 'खतरो के खिलाडी'च्या फायनलकडे कूच करतोय. पण अशातच गश्मीरचा शालिन भानोतसोबत वाद रंगला. इतकंच नव्हे तर दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

गश्मीर-शालीनमध्ये रंगला वाद

गश्मीर महाजनी आणि शालिन भानोत यांच्याविषयीची एक क्लिप व्हायरल होतेय. या क्लिपमध्ये गश्मीरचा संताप अनावर झाला असून तो एका क्रू मेंबरला धक्का देतो. पुढे  शालीन भानोत तिकडे येतो. दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन धक्काबुक्की होते. गश्मीरच्या कानात यावेळी हेडफोन दिसला असून ही मारामारी आणि धक्काबुक्की पूर्वनियोजित असल्याची शक्यता निर्माण होत आहे. गश्मीरची ही व्हायरल क्लिप सध्या चर्चेत आहे.

गश्मीर खतरो के खिलाडीच्या फायनलमध्ये पोहोचणार?

गश्मीर महाजनी 'खतरो के खिलाडी'मध्ये सहभागी आहे. गश्मीर महाजनी त्याच्या उत्कृष्ट खेळाने KKK 14 मध्ये चमक दाखवतोय. गश्मीरने आतापर्यंत सर्व स्टंट खूप चांगल्या पद्धतीने केले. इतकंच नव्हे तर कोणताही वाद न करता शांतपणे गश्मीर खतरो के खिलाडी १४ मध्ये पुढे सरकतोय. आता गश्मीर फायनलपर्यंत पोहोचणार का, हे थोड्या दिवसांमध्ये कळून येईलच. गश्मीर लवकरच प्राजक्ता माळीसोबत 'फुलवंती' या मराठी सिनेमात झळकणार आहे.

 

टॅग्स :खतरों के खिलाडीगश्मिर महाजनीगश्मिर महाजनीटेलिव्हिजनरोहित शेट्टी