सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात. मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनीच्या सोशल मीडियावर बराच अॅक्टिव्ह असतो. गश्मीरनं नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
त्याचा हा फोटोत तुम्हाला त्याची सिक्स पॅक अब्स आणि पिळदार बॉडी पाहायला मिळेल. गश्मीरची पिळदार बॉडी पाहून त्याच्या या फोटोला त्याच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे तो बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.
मराठीतील एक हँडसम अभिनेता म्हणून गश्मीर महाजनीची ओळख आहे.आकर्षक चेहरा आणि पिळदार बॉडी असलेल्या गश्मीरच्या फोटोंना नेहमीच चाहते भरघोस पसंती देत असतात. त्याच्या सोशल मीडिया पेजवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील त्याचे फोटो पाहायला मिळतील.आपल्या बॉडीवर इतर कलाकारांप्रमाणे गश्मीरही प्रचंड मेहनत घेतो.
बॉडी पिळदार ठेवण्यासाठी, ऍब्ज कमावण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो. गश्मीरही फिटनेस फ्रिक अभिनेता आहे.
फिटनेसबाबत सजग असलेला गश्मीरने मोठ्या मेहनतीने पिळदार बॉडी कमावल्याचे हा फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल. गश्मीरची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. या फोटोला त्याने एक कॅप्शनही दिले आहे.
फोटो शेअर करत त्याने दिलेल्या कॅप्शननेच त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहीलंय की, उन्हाळा आला, कि फक्तं मलाच घाम फुटलाय? गश्मीर महाजनी आता 'इमली' या हिंदी मालिकेत झळकत आहे. या मालिकेत गश्मीर महाजनीसोबत आणि अभिनेत्री मयुरी देशमुखही मुख्य भूमिकेत आहे.