सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. गौरी आणि जयदीप आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच दोघांनीही सरोगसीद्वारे मुलाला जन्म द्यायचे ठरवले. यासाठी मानसीने पुढाकार दाखवला मात्र मानसीचा खरा डाव गौरीला समजला आणि शालिनी-मानसीच हेच षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिला उंच कड्यावरून ढकलून दिले. हा सीन या मालिकेतला मोठा टर्निंग पॉईंट ठरला आहे.
मालिकेत गौरीचा मृत्यू झाला असं वाटत असताना आता मात्र थेट गौरीने बदला घेण्यासाठी म्हणून तिचा नवा अवतार घेतला आहे आणि घेऊन शिर्के पाटील कुटुंबात एंट्री केलीये. गौरीचा हा नवा लूक आणि तिची गावरान एन्ट्री काहींना आवडली तर काहींना हा ओव्हर ड्रामा वाटतो. त्यामुळे सोशल मीडियावर ही मालिका खूप ट्रोल होताना दिसते आहे. इतके सगळं व्यवस्थित सुरु असताना हा ट्विस्ट आणून चांगल्या मालिकेची वाट लावली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.
गौरीला गंगुबाईच्या एंट्रीशी तुलना करत गौराबाई काठियावाडी असं म्हणतायेत इतकंच नाही तर त्या गौरीचे किती लूक चेंज करणार आहात? असं एका युजरने म्हटले आहे. तर काय फाल्तुगिरी आहे असे कसे मालिकेतील पात्र बदलतात तसंच लाज नाही वाटत का काहीही दाखवायला अशा एक ना अनेक कमेंट्स करुन मालिकेला ट्रोल केले जात आहे. एकाने तर एवढी फालतुगिरी एका कुटुंबात होऊ शकते का असे म्हटले आहे. काही प्रेक्षकांनी हा ट्विस्ट ओळखून ही गौरीच आहे आणि बदला घ्यायला आली असल्याचं म्हटलंय. काहींनी गौरीचा डंका म्हणत तिच्या या लूकचे कौतुक देखील केले आहे.