गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. लवकरच गौरव छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. स्टार प्रवाहवरील आबोली मालिकेत तो लवकरच एंट्री करणार आहे. त्याला या नव्या भूमिकेत बघण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
गौरव अबोली मालिकेत अबोलीच्या वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेत सोहमचा खून झालाय आणि अंकुश याचा तपास करतोय. सोहमच्या खुनाच्या आरोपखाली अबोलीला अटक करण्यात आली आहे. पण अबोलीने हा खून केलेला नाही तो अंकुशची बहीण राघुने केला आहे.
राघूला वाचवण्यासाठी आबोली हा आरोप स्वत:वर घेते.अंकुशसमोर हे सत्य आलं आहे. अबोलीच्या बाजूने ही केस अभिनेता गौरव घाटणेकर लढणार आहे. आता गौरव अबोलीला यातून कसा निर्दोष सिद्ध करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच अंकुश स्वतःच्या बहिणीला अटक करणार का, राघु गुन्हेगार सिद्ध होणार का हे बघण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
दरम्यान गौरव घाटणेकरच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर त्याची पत्नी ही मराठी आणि साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गौरव घाटणेकरने अभिनेत्री श्रुती मराठेशी लग्नगाठ बांधली आहे.
श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. अनेकवेळा दाघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करतात. श्रुती धर्मवीर सिनेमामध्ये अलीकडेच दिसली होती. यात तिने तन्वी महापात्राची भूमिका साकारली आहे.