'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गौरव खन्ना 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता ठरला. गौरवने त्याच्या पाककौशल्याने परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेत 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या पहिल्या सीझनचा विनर होण्याचा मान गौरव खन्नाने पटकावला.
गौरव खन्नाने ग्रँड फिनालेमध्ये फणसापासून खास पदार्थ आणि आइसक्रिम स्वीट डिश बनवून परीक्षकांना खूश केलं. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या ग्रँड फिनालेला फराह खान, विकास खन्ना, रणवीर ब्रार यांच्यासोबत प्रसिद्ध शेफ संजीव कपूरही उपस्थित होते. गौरव खन्नाने त्याच्या डिशने संजीव कपूर यांचंही मनं जिंकून घेतलं. गौरव खन्नाचं पाककौशल्य पाहून संजीव कपूरही आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी अभिनेत्याचं कौतुकही केलं.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची ट्रॉफी आणि इतके लाख रुपये
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'चा विजेता ठरल्यानंतर गौरव खन्नाला बक्षीस म्हणून ट्रॉफी आणि काही रोख रक्कम देण्यात आली आहे. ट्रॉफीसोबत त्याला २० लाख रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
गौरव खन्ना, निक्की तांबोळी आणि तेजस्वी प्रकाश यांनी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या टॉप ३मध्ये स्थान मिळवलं होतं. गौरव खन्नाने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर निक्की तांबोळी उपविजेती ठरली. आणि तेजस्वी प्रकाशला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.