Join us  

"पाठीवरुन हात फिरवला,आशीर्वाद दिला आणि...", नाना पाटेकरांना भेटून गौरव मोरेला झाला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 5:13 PM

Gaurav More : गौरव मोरे याने नुकतेच लोकमत सरपंच अवॉर्ड्सला हजेरी लावली होती. यावेळी त्याची भेट दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत झाली. त्यांना भेटून त्याला खूप आनंद झाला.

अभिनेता गौरव मोरे(Gaurav More)ने आजवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हास्यजत्रेत गौरव मोरेने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. या कार्यक्रमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान नुकतेच गौरव मोरे याने लोकमत सरपंच अवॉर्ड्सला हजेरी लावली होती. यावेळी त्याची भेट दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यासोबत झाली. त्यांना भेटून त्याला खूप आनंद झाला. 

गौरव मोरेने इंस्टाग्राम अकाउंटवर नाना पाटेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले की, काय बोलू सुचत नाहीये.पाठीवरुन हात फिरवला,आशीर्वाद दिला आणि खुप कौतुक केलं. ज्यांना बघुन आपण काम करतोय, ज्यांच्याकडून आपण कायम शिकत राहु असे आपले लाडके श्री. नाना पाटेकर साहेब. लोकमत सरपंच अवार्ड सोहळ २०२४ च्या निमित्ताने आज भेट झाली. त्यासाठी मी लोकमतचा खूप आभारी आहे. तुमच्यामुळे मी आज साहेबांना भेटलो.

अभिनेता गौरव मोरेचा नुकताच अल्याड पल्याड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. या चित्रपटात गौरव मोरे व्यतिरिक्त मकरंद देशपांडे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत. अल्याड पल्याड शिवाय लंडन मिसळ, बॉईज ३ यासारख्या सिनेमात झळकला आहे. 

टॅग्स :नाना पाटेकरमहाराष्ट्राची हास्य जत्रा