सध्याच्या घडीला गौरव मोरे (Gaurav More)ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आपल्या टॅलेंटच्या जोरावर गौरवने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरात पोहचला. या शोनंतर त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये तुफान वाढ झाली आहे. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. दरम्यान आता अभिनेता गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो सोडणार असल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान याबाबत आता गौरव मोरेने खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विनोदवीर गौरव मोरे महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये दिसत नाही आहे. त्यामुळे त्याने हा शो सोडल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान आता मुंटाला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले आहे. ही निव्वळ अफवा असल्याचे त्याने म्हटले आहे. तो सध्या सुट्टीवर आहे. त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडलेला नाही. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याने डॉक्टरांच्या सांगण्यावरून काही महिने सुट्टी घेतल्याचे त्याने सांगितले.
मी पुन्हा हास्यजत्रेत सहभागी होणारतो म्हणाला की, माझ्या अॅक्टमध्ये बरीच हालचाल असते; सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. डॉक्टरांनी खांद्यावर फार ताण देण्यासाठीही मनाई केली आहे. काही महत्त्वाच्या कामानिमित्त माझ्या भेटीगाठी सुरू आहेत. मार्च महिन्यात मी पुन्हा हास्यजत्रेत सहभागी होणार आहे.
वर्कफ्रंट...गौरव मोरेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो महाराष्ट्राची हास्यजत्रा शो व्यतिरिक्त बऱ्याच सिनेमात झळकला आहे. मागील वर्षात तो 'अंकुश', 'बॉइज ४', 'सलमान सोसायटी', 'लंडन मिसळ' या चित्रपटात काम करताना दिसला आहे. तो प्रसाद ओकची मुख्य भूमिका असणाऱ्या 'महापरिनिर्वाण' या चित्रपटात दिसणार आहे.