छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh mhanje nakki kay asta). ही मालिका सुरु होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, दरवेळी मालिक येणाऱ्या चढउतारांमुळे ही मालिका रंजक होत आहे. जयदीप आणि गौरी यांच्यात हळूहळू प्रेम फुलत असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आला. इतकंच नाही तर जयदीपने गौरीला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. गौरी आपला लूक बदलून शिर्के पाटीलांच्या घरात जयदीप, मानसी आणि शालिनीला धड्या शिकवायला आलीय.
मराठी सिरिअल ऑफिशयलने शेअर केलेल्या व्हि़डीओमध्ये गौरी शालिनी आणि देवकीला कपडे धुवायला सांगतेय. माई दोघींच्या हातात घरातले सगळ्यांचं कपडे देतात. गौरी त्यांना खाली येऊन कपडे धुण्याचे आदेश देते. रुप बदलून आलेली नवी पाहुणी गौरीच असल्याचं केवळ माईंना माहित आहे.त्यामुळे माई तिची साथ देतात.
दरम्यान, गौरी आणि जयदीप यांना मूल होणार नसल्याचं लक्षात येताच ते सरोगसीद्वारे बाळाला जन्म द्यायचं ठरवतात. यासाठी मानसीने पुढाकार दाखवला. परंतु, मानसी हे सारं शालिनीच्या सांगण्यावरुन करत असल्याचं गौरीला समजतं. त्यामुळे ती जयदीपला सांगायचा प्रयत्न करते. परंतु, तो मानसीसमोर गौरीला उंच कड्यावरुन खाली ढकलतो. त्यानंतर आता गौरी नवं रुप घेऊन या मालिकेत आली आहे.