Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये गौरी उतरवणार शालिनी आणि देवकीचा माज, शिकवणार चांगलाच धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 1:42 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. गौरी शालिनी आणि मानसीला चांगलंच वठणीवर आणणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलले होते. त्यानंतर माईंच्या साथीने गौरी शालिनी, मानसी आणि जयदीपला धडा शिकवण्यासाठी स्मरणशक्ती गेल्याचा बनाव करुन घरात आली आहे. आता ती शालिनी आणि मानसीला चांगलंच वठणीवर आणणार आहे. 

गौरी जिरवणार शालिनी, देवकी चा माज, तिला केलेल्या त्रासाचा वचपा घेत देणार त्यांना खायला शिळं अन्न देते. मराठी सिरियल्सच्या पेजवर मालिकेचा एक प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे.  यात गौरी शालिनी आणि मानसीला शिळं अन्न जेवायला देते. शालिनी म्हणते मी शीळ जेवण अन्न खात नाही आणि या थाळीत तर अजिबात नाही. यावर गौरी दोघांनी आपला धाक दाखवते.  गौरीला शालिनी आणि मानसीला शिळं अन्न देताना त्यांनी आपल्याला दिलेला त्रास आठवतो. 

दरम्यान गौरीला शालिनी आणि अनिलचा सगळा प्लान कळणार आहे. त्यामुळे तिला कड्यावरून ढकलणारा जयदीप नसून अनिल असतो हेदेखील तिला कळते. त्यामुळे शालिनीच्या तावडीतून जयदीपला गौरी सोडून आणणार आहे. तसेच गौरी शालिनी आणि अनिलचा पर्दाफाश करणार आहे. शिर्के पाटील कुटुंबाला जेव्हा शालिनी आणि अनिलचा प्लान कळेल तेव्हा ते काय करतील हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह