Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत गौरीचा होणार मेकओव्हर, दिसणाऱ्या नव्या लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:37 PM

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आतापर्यंत आपण गौरीला साडी मध्ये पाहात आलोय.

स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील गौरी तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत आतापर्यंत आपण गौरीला साडी मध्ये पाहात आलोय. पण लवकरच मालिकेत गौरी एका वेगळ्या लूक बघायला मिळणार आहे.

गौरी आता पहिल्यापेक्षा खूप स्टॉंग झालेली आणि आता ती साऊथ इंडियन लूकमध्ये प्रेक्षकांंना समोर येणार आहे. आता गौरीचा साऊथ इंडियन लूक चाहत्यांना आवडणार हे आपल्याला लवकरच कळेल, दरम्यान आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं.

 यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला. मात्र मानसीचा खरा डाव आता गौरीला कळला आहे. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं आहे.शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करते.  गौरी जयदीपला आपण आई होणार असल्याचं सांगतं. ज्या मानसीला आपण बहीण मानत होते तिने आपल्याला फसवलं असल्याचं सांगते. मात्र जयदीप गौरीसमोर मानसीच्या हाताला kiss करतो आणि गौरीला उंच कड्यावरून ढकलून देत असल्याचे प्रोमोमध्ये दिसते आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाहटिव्ही कलाकार