Pushpa 2: सध्या सर्वत्र एकाच सिनेमाची चर्चा आहे आणि तो म्हणजे 'पुष्पा २'. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २'ने चाहत्यांना वेड लावलं आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच 'पुष्पा २'मधील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या अंगारो सा या गाण्याने चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता श्रीवल्लीच्या या गाण्यावर गौतमी पाटीलने रील बनवला आहे.
लावणी डान्सर गौतमी पाटीलचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. गौतमी तिच्या नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक व्हिडिओ गौतमी शेअर करताना दिसते. आता गौतमीने अंगारो सा गाण्यावरील रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती श्रीवल्लीसारख्या हुक स्टेप करताना दिसत आहे. गौतमीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाऊन टाकलं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत ९७३ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरत अल्लू अर्जुनचा हा सिनेमा १००० कोटींचा आकडा पार करेल. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' सिनेमाचा हा सीक्वल आहे. 'पुष्पा २'नंतर आता 'पुष्पा ३'ची देखील घोषणा करण्यात आली आहे. आता या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.