Gautami Patil: 'सबसे कातील गौतमी पाटील' (Sabse Katil Gautami Patil) असं म्हणत लावणी डान्सर गौतमी पाटीलचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात. गौतमी पाटीलचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. गौतमी तिच्या नखरेल अदांनी चाहत्यांना घायाळ करते. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक व्हिडिओ आणि फोटो गौतमी शेअर करताना दिसते. आता गौतमीने काही खास फोटो शेअर केले आहेत. जे चर्चेत आले आहेत.
गौतमीने इन्स्टाग्रामवर दिग्गज अभिनेते अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गौतमी प्रचंड आनंदी दिसतेय. यासोबतच गौतमीने सिद्धार्थ जाधव, विशाल निकम, अमर जाधव यांच्याबरोबरही खास पोझ दिल्यात. गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हे फोटो 'स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५' ( Star Pravah Parivaar Puraskar 2025) या सोहळ्यामधील आहेत. या सोहळ्यात गौतमीची खास अदाकारी दिसली.