Join us

VIDEO: स्वामी समर्थांच्या भक्तीत गौतमी पाटील झाली तल्लीन; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:36 IST

सोशल मीडियास्टार, नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

Gautami Patil: सोशल मीडियास्टार, नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आपल्या दिलखेचक अदा आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने तिने संपूर्ण महाराष्टाला वेड लावलं आहे. दिवसेंदिवस गौतमीचे कार्यक्रम आणि लोकप्रियता वाढत चालली आहे. सध्या तरुण वर्गामध्ये गौतमी पाटील या नावाची मोठी क्रेझ पाहायला मिळते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर असतात. गौतमी पाटीलची सोशल मीडियावरही चांगली फॅनफोलोइंग आहे. त्याद्वारे ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकताच गौतमीने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. 

गौतमी पाटील श्री स्वामी समर्थांच्या भक्तीत तल्लीन झाल्याची पाहायला मिळते. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेतल्याचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केलेत. "श्री स्वामी समर्थ..." असं कॅप्शन देत गौतमीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वामीभक्तीत तल्लीन झालेल्या गौतमीने स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेत आरती देखील केली आहे. गौतमीची ही स्वामी भक्ती पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

गौतमी पाटील आता मराठी सिनेसृष्टीत सुद्धा सक्रिय झाल्याची पाहायला मिळतेय. 'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरु', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' तसेच 'पाटलांचा बैलगाडा' यांसारख्या गाण्यांवर डान्स करत तिने चाहत्यांची मनं जिंकली.अलिकडेच गौतमी 'लाइक आणि सबस्क्राइब' चित्रपटामधील 'लिंबू फिरवलं' या आयटम साँगमध्ये झळकली.

टॅग्स :गौतमी पाटीलटिव्ही कलाकारसोशल मीडिया