भटकंती कुणाला नाही आवडत... आपल्यापैकी प्रत्येकालाच फिरायला आवडतं. आपल्या आजूबाजूच्याच नाही तर देश आणि जगातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला प्रत्येकालाच आवडतं. या पर्यटनस्थळी निवांत क्षण घालवणं प्रत्येकालाच भावतं. विविध पर्यटनस्थळांची सफारी आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात.
अभिनेत्री गायत्री दातारही सध्या तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. गायत्रीने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे गायत्रीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.गायत्री सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.
आपल्या खासगी आणि प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. नुकतंच तिने शेअर केलेला एक फोटो तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरतोय. निसर्गाच्या सान्निध्यात गायत्री निवांत क्षण घालवताना दिसते. खऱ्या आयुष्यात गायत्री स्वतः खूप एडव्हेंचरस आहे.
अभिनयासोबतच तिला भटकंतीची फार आवड आहे. ट्रेकिंगचीही आवड आहे. शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून ती आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देते. यापूर्वीहू गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे. गायत्रीलाही प्रचंड भटकंतीची आवड असल्याचे सोशल मीडियावर नजर टाकल्यास समजते.
या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. व्हॅकेशन एन्जॉय करण्याचा आनंद गायत्रीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. अभिनयासोबतच तिच्या विविध अंदाजातील फोटोंनीही ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्याही संख्येत भर पडत आहे.