Ghum Hai Kisikey Pyaar Meiin Take A 12 Year Leap: स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'गुम है किसी के प्यार में' नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. या मालिकेत भाविका शर्मा ही सवीची भूमिका साकारत असून शक्ती अरोरा ईशानच्या भूमिकेत आहे. चाहत्यांना दोघांची जोडी आणि कथादेएखील आवडली आहे. परंतु निर्माते या मालिकेत नवीन ट्विस्ट आणण्याच्या विचार करत आहेत. शोमध्ये पुन्हा एकदा लीप येऊ शकते, ज्यामुळे कथा पूर्णपणे बदलेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोच्या रेटिंगमध्ये लक्षणीय घसरण होत आहे. या कारणास्तव, निर्माते शोचे रेटिंग वाढवण्यासाठी नवीन योजना बनवत आहेत. या मालिकेत 10 ते 12 वर्षांचा लीप येणार असेल असा दावा केला जात आहे. एवढेच नाही तर शोच्या कलाकारांमध्येही मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो. अशा परिस्थितीत आता चाहत्यांच्या नजरा भाविका शर्मा आणि शक्ती अरोरा यांच्यावर आहेत.
'गुम है किसी के प्यार में' मध्ये सवी आणि ईशानमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे. सावी आणि ईशान घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात, परंतु नंतर सवीची बहीण हरिणी शुद्धीवर येते, तिची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगितलं जातं. यामुळे ईशान आणि सवी त्यांच्या घटस्फोटाबद्दल हरिणीला सांगू शकत नाहीत. इतकंच नाही तर ईशान सवीपासून वेगळा होऊन रीवाशी लग्न करायला तयार होतो. पण तो पुन्हा एकदा सावी आणि हरिणीसाठी रीवाला एकटं सोडतो, ज्यामुळे सगळेच संतापतात. आता मालिकेत पुढे काय घडते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.