Join us

लेडिज स्पेशल मालिकेमुळे गिरीजा ओकला मिळाली ही संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 6:30 AM

गिरीजा ओक ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला नुकताच लेडिज स्पेशल या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एक सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला.

ठळक मुद्देआपल्याला लावणी सादर करायची आहे हे कळल्यापासून ती खूपच उत्साहात आहे आणि नृत्याचे सर्व बारकावे समजून घेण्यासाठी ती सलग अनेक दिवस सराव करत आहे.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या सर्वात आवडत्या लेडिज स्पेशल या मालिकेने आपल्या अद्भुत संकल्पनेने सर्व प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. या मालिकेचे कथानक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या तीन सक्षम आणि भिन्न व्यक्तिमत्व असणार्‍या महिलांच्या भोवती फिरते. या मालिकेत नेहमीच विविध जाती-धर्मातील सण-वार दाखवले जातात. या मालिकेत मेघनाची भूमिका साकारणार्‍या गिरीजा ओकला या मालिकेमुळे नुकतीच तिची एक इच्छा कित्येक वर्षांनी पूर्ण करण्याची संधी मिळाली. गिरीजाला तिचे आवडते लावणी नृत्य सादर करण्याची संधी या मालिकेमुळे मिळणार असल्याचे कळल्यामुळे ती चांगलीच भारावली होती. गिरीजा ओक ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला नुकताच लेडिज स्पेशल या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एक सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. सध्या या मालिकेने एक चांगलेच वळण घेतले असून या मालिकेत विविध घटना घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता होळीच्या भागात सुंदर पारंपारिक नऊवारी साडी नेसून गिरीजा लावणी सादर करताना दिसणार आहे. आपल्याला लावणी सादर करायची आहे हे कळल्यापासून ती खूपच उत्साहात आहे आणि नृत्याचे सर्व बारकावे समजून घेण्यासाठी ती सलग अनेक दिवस सराव करत आहे. याविषयी ती सांगते, “माझ्याकडे या सक्षम आणि सुंदर नृत्य शैलीशी निगडीत असलेल्या बर्‍याच आठवणी आहेत. ही नृत्यपद्धती माझ्या अंतःकरणाच्या अगदी जवळची आहे. जेव्हा हा ठेका कानावर पडतो तेव्हा मी भूतकाळात रमते. कारण मी अगदी लहान असल्यापासून लावणी नृत्य सादर करत आहे. जेव्हा मला कळले की, माझे आवडते नृत्य मला सर्व जगासमोर सादर करायचे आहे, तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मी खूप उत्साहात आहे आणि मला आशा आहे की मी त्याला पूर्ण न्याय देऊ शकेन.”

टॅग्स :लेडीज स्पेशलगिरिजा ओक