स्वत:चे हुबेहूब पोट्रेट बघून हरकून गेली गिरीजा प्रभू, मानले चाहत्यांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 02:36 PM2020-12-22T14:36:33+5:302020-12-22T14:40:25+5:30
चाहते कलाकारांना सोशल मीडियावरुनच आपली प्रतिक्रिया कळवत असतात. मात्र या चाहत्याने गौरी आणि मालिकेचं कौतुक करणारं पत्र पाठवत मालिकेविषयी असणारं प्रेम व्यक्त केलं.
सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. चाहतेही विविध माध्यमातून आपल्या लाडक्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करत असतात. कोणत्याही कलाकारासाठी चाहत्यांकडून मिळणारं भरभरुन प्रेम हीच कामाची पोचपावती असते. चाहत्यांच्या याच प्रेमामुळे नवं काम करण्याची ऊर्जा मिळते. असाच काहीसा अनुभव सांगितला आहे तो अभिनेत्री गिरीजा प्रभूने. गिरीजा सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत गौरीची भूमिका साकारते आहे.
या मालिकेतील जयदीप – गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. त्याचीच पोचपावती म्हणून गौरीच्या एका खास चाहत्याने गौरीला मालिकेतील पोट्रेट आणि स्वलिखित एक पत्र भेट म्हणून दिलं आहे. पोट्रेटमध्ये स्वत:ची हुबेहूब प्रतिमा बघून तिला एवढा आनंद झाला की, तिने हे पोट्रेट फेसबुकवर चाहत्यांबरोबर शेअर केले आहे. हे पोट्रेट सोशल अकाउंटवर शेअर केले असून, तिने आर्टिस्टचे तोंडभरून कौतुकही केले आहे.
सोशल मीडियाच्या काळात पत्र लिहिणं तसं मागे पडत चाललं आहे. चाहते कलाकारांना सोशल मीडियावरुनच आपली प्रतिक्रिया कळवत असतात. मात्र या चाहत्याने गौरी आणि मालिकेचं कौतुक करणारं पत्र पाठवत मालिकेविषयी असणारं प्रेम व्यक्त केलं. या अनोख्या गिफ्टने गौरीही भारावून गेली. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच राहो अशी भावना तिने व्यक्त केली.त्याचबरोबर तिने चाहत्याचे कौतुक केले. एवढ्या सुरेख पद्धतीने स्वत:चे पोट्रेट साकारणा-या आर्टिस्ट चाहत्याला तिने ‘हॅट्स आॅफ’ म्हणून दाद दिली आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत सध्या गौरी घर सोडून गेल्याचा ट्रॅक सुरु आहे. गौरीला शोधण्याचे बरेच प्रयत्नही सुरु आहेत. त्यामुळेच गौरीचे चाहते सध्या तिला मालिकेत मिस करत आहेत. तिने लवकरात लवकर परत यावं अशी मागणीही करत आहेत. या पत्रातही तसा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.