‘बिग बॉस’चं 17 वं पर्व दिवसेंदिवस रंगतदार होत चाललं आहे. निर्माते टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवताना दिसत आहेत. शोच्या आगामी एपिसोडमध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे. आता कार्यक्रमात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक लोकप्रिय ग्लोबल स्टार शोमध्ये सामील होणार असल्याचे अपडेट समोर आले आहे.
बिग बॉस 17 मध्ये सहभागी होणारी हा नवीन स्पर्धक कोरियाचा लोकप्रिय गायका आहे. ऑरा असे या के-पॉप स्टारचे नाव असून शोमध्ये त्याची एन्ट्री निश्चित झाली आहे. ही वाईल्ड कार्ड एन्ट्री आधी पुढे ढकलण्यात आली होती, पण आता ती लवकरच होणार आहे.ऑराने इन्स्टा स्टोरीमध्ये काही पत्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये बिग बॉससाठी अभिनंदन करण्यात आले आहे. तथापि, शोच्या निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
ऑराचे खरे नाव पार्क मिन-जून आहे, जो दक्षिण कोरियाचा लोकप्रिय गायक आणि संगीतकार आहे. ऑरा 'कोरियन बॉय बँड डबल ए'चा सदस्य आहे. या गायकाने 2009 मध्ये 'लव्ह बॅक' या गाण्याने करिअरची सुरुवात केली होती. अनेकदा तो भारतीय स्टार्ससोबत दिसला आहे. राणी मुखर्जीपासून वैभवी मर्चंटपर्यंत अनेक स्टार्सच्या भेटी त्याने घेतलेल्या आहेत.
‘बिग बॉस’च्या या पर्वात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळतील. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी यंदा बरेच ट्विस्ट ठेवण्यात आले आहे. घर तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे आणि ते ‘दिल, दिमाग आणि दम’ थीमवर आधारित आहे. आतापर्यंत 'बिग बॉस 17'च्या घरातून आतापर्यंत 5 स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले आहे. सोनिया बन्सल, मनस्वी ममगाई, नावेद सोल, जिग्ना, तहलका उर्फ सनी आर्याला शोमधून काढण्यता आले आहे.