Join us

​हा अभिनेता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी हॉटेलमध्ये घासायचा भांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 7:34 AM

रोनित रॉयने जान तेरे नाम या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने सैनिक, आर्मी यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. ...

रोनित रॉयने जान तेरे नाम या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने सैनिक, आर्मी यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले. पण रोनितला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नाही. तो अनेक वर्षं अभिनयापासून दूर होता. पण छोट्या पडद्यावरील कसोटी जिंदगी की या मालिकेने त्याचे करियर संपूर्णपणे बदलले. या मालिकेत त्याने साकारलेल्या ऋषभ बजाज या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली. यानंतर तो क्योंकी साँस भू कभी बहू थी या मालिकेत झळकला. आज छोट्या पडद्यावरील सगळ्यात यशस्वी अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे तर मोठ्या पडद्यावर देखील तो खूप चांगल्या भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. एक अभिनेता असण्यासोबतच रोनित एक प्रसिद्ध बिझनेसमन देखील आहे. त्याची सिक्युरिटी एजन्सी असून या एजन्सीद्वारे अनेक प्रसिद्ध बॉलिवूडच्या कलाकारांना संरक्षण पुरवले जाते. रोनित अभियक्षेत्रात येण्यापूर्वी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करायचा. त्या हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते टेबल पुसण्यापर्यंतची सगळी कामे रोनितने केली आहेत. रोनितने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर तो एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करायला लागला. रोनितचे बालपण अहमदाबाद शहरात गेले आहे. मुंबईत आल्यावर तो सुभाष घई यांच्याकडे राहायला लागला. त्याला अभिनय क्षेत्रातच करियर करायचे होते. पण चित्रपटात काम मिळणे सोपे नसल्याने तू काही तरी नोकरी कर असे सुभाष घई यांनी त्याला सांगितले. त्यामुळे त्याने सी रॉक या हॉटेलमध्ये ट्रेनी म्हणून काम करायला सुरुवात केली. त्या हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते टेबल पुसण्यापर्यंत सगळी कामे रोनितने केली आहेत. रोनित हॉटेलमध्ये काम करत असला तरी त्याचे सगळे लक्ष हे बॉलिवूडकडे होते. त्याचे काही केल्या या कामात मन रमतच नव्हते. त्याचदरम्यान जान तेरे नाम या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांनी रोनितला जान तेरे नाम या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि रोनित नोकरी सोडून अभिनय क्षेत्राकडे वळला. Also Read : हे छोट्या पडद्यावरचे कलाकार चित्रपटातील अभिनेत्यांपेक्षाही कमावतात जास्त पैसे