GOOD NEWS: लग्नाच्या 13 वर्षानंतर गौरी टोकने दुस-यांदा दिला बाळाला जन्म,यश टोकने शेअर केली चाहत्यांसह गुड न्युज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2017 8:12 AM
''मेरे घर आई एक नन्ही परी''..... म्हणत अभिनेता यश टोक आणि गौरी टोक यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला ...
''मेरे घर आई एक नन्ही परी''..... म्हणत अभिनेता यश टोक आणि गौरी टोक यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. कारण मंगळवारी गौरीने दुस-यांदा एका लहान परीला जन्म दिला आहे.यश आणि गौरीच्या पहिली मुलगी मायरा ही 13 वर्षाची आहे. त्यामुळे सध्या गौरी आणि यश खूप खुष आहेत. या बाळआसाठी त्यांनी खूप प्लॅनिंग केले होते. होणा-या बाळाचे नाव काय ठेवणार यापासून सगळ्या गोष्टींचे स्वप्न या दोघांनी रंगवले होते.अखेर या दोघांचे स्वप्न पूर्ण झाले असून आता त्यांच्या घरात पुन्हा एकदा लहानबाळाचा आवाज गुंजतोय. घरातही वातावरण खूप प्रसन्न असून मायरालाही एक लहान बहिण भेटली.त्यामुळे मायराही तिच्या या लहान बहिणाला 1 मिनीटही एकटे सोडत नाहीय. माझ्यापेक्षा मायराच तिच्या लहान बहिणीची जास्त काळजी घेत असल्याचे गौरीने म्हटले आहे. मायरा आत्तापासूनच तिच्यासह गप्पा गोष्टी करत असते. आपल्या छोट्या बहिणीचे मायराचे प्रेम पाहुन मन भरून येत असल्याचे यशने म्हटले आहे. तसेच आता दोन्ही मुलींमुळे आमचे घरात दिवसभर काहीना काही सुरू असते त्यामुळे प्रसन्न वातावरण निर्माण झाले. आमच्या दोन्ही मुलींच्या रूपात मी आणि गौरी पुन्हा एकदा आमचे बालपण जगत असल्याचे यशने म्हटले आहे. एकता कपूरची मालिका ‘कहीं किसी रोज’च्या सेटवर यश आणि गौरीची भेट झाली होती. हळुहळु या दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांची चागंल्या केमिस्ट्रीमुळे दोघे लग्नबंधनात अडकले.वयाच्या 23व्या वर्षीच गौरीने तिच्या पहिल्या मुलीला जन्म दिला होता.मायराच्या जन्मानंतर गौरीने तिच्या करिअरपासून काहीवर्षांसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर सोनी टीव्हीवरील ‘ये वादा रहा’ या मालिकेत यश आणि गौरी एकत्र झळकले होते.या मालिकेनंतर या दोघांनी एकत्र काम केले नाही. तसेच यश हा रूपेरी पडद्यावर 'जय हो' या सिनेमातही झळकला होता.