Join us

Good News! 'तारक मेहता' मालिकेत दयाबेनचं कमबॅक, दिशा वकानीनं निर्मात्यांसमोर ठेवल्या 'या' तीन अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:21 IST

Tarak Mehta Ka Ulta Chashma: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढाने मालिका सोडल्याचे समोर आले आहे. हे वृत्त ऐकून चाहते नाराज झाले आहे. मात्र आता चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma)मध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढा(Shailesh Lodha)ने मालिका सोडल्याचे समोर आले आहे. हे वृत्त ऐकून चाहते नाराज झाले आहे. मात्र आता चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेत जेठालालची पत्नी बनलेली दिशा वकानी (Disha Vakani) मालिकेत कमबॅक करू शकते, परंतु असे देखील बोलले जात आहे की दिशाने मालिकेत परतण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत.

२०१७ मध्ये अभिनेत्री दिशा वकानीने प्रसूती रजा घेतली होती. त्यानंतर ती तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत परतली नाही. मालिकेच्या निर्मात्यांनी दिशाला परत आणण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. अनेक प्रयत्नांनंतरही जेव्हा दिशाने मालिकेत परतण्यास नकार दिला. अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. पण आता ती या शोमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा वकानीने निर्मात्यांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. दिशा वकानीची पहिली अट आहे की ती प्रत्येक एपिसोडसाठी दीड लाख रुपये आकारेल. दिशा वकानीने आणखी एक अट घातली आहे की ती शूटिंगसाठी दिवसातून फक्त ३ तास देईल. तिच्यासोबतच दिशा वकानीनेही तिच्या मुलासाठी निर्मात्यांसमोर एक अट ठेवली आहे. अभिनेत्रीची तिसरी अट म्हणजे ती मालिकेत तेव्हाच येईल जेव्हा तिच्या मुलासाठी पाळणाघर बांधले जाईल. दिशा वकानीच्या अटी निर्मात्यांनी मान्य केल्या आहेत की नाही याचा खुलासा अद्याप झालेला नाही. सध्या या बातमीने मालिकेचे चाहते खूप खूश आहेत.

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा