Join us

खुशखबर..! रसिका सुनील लवकरच अडकणार लग्नबेडीत, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 20:52 IST

शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.

माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय ठरलेल्या मालिकेतून शनायाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. रसिका सुनील सोशल मीडियावर खूप सक्रीय असून तिचे खूप चाहते आहेत. नुकतेच रसिकाने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर खुशखबर दिली आहे. खरेतर तिने नाही तर तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

रसिकाचा बॉयफ्रेण्ड आदित्य बिलागीने एक पोस्ट शेअर केली आहे. हीच पोस्ट रसिकाने देखील शेअर केली आहे. यात तिचा लाडका रश देखील दिसतो आहे. तिघांनी देखील हातात एक पाटी पकडली आहे. या पाटीवर “माझे मानव दोस्त लग्न करत आहेत” असे लिहिण्यात आले आहे.

तर कॅप्शनमध्ये देखील स्पेशल मेसेज लिहिण्यात आला आहे. “जेव्हा रसिका रशला भेटण्यासाठी मला पहिल्यांदा घेऊन गेली तेव्हा तो म्हणाला की माझ्या वयात एका नजरेत कळते की मुलगा आणि मुलीमध्ये काय सुरू आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला रशची भविष्यवाणी सांगण्याचा विचार करत आहोत” असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तर पुढे आदित्यने “आय लव्ह यू सो मच रसिका हे अधिकृतपणे जाहीर करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही” असेही म्हटले आहे.

रसिका आणि आदित्यच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत रसिकाने आदित्यसोबत असलेल्या नात्याची कबुली दिली होती.

रसिका आणि तिचा बॉयफ्रेण्ड आदित्य सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यामुळे ते बऱ्याचदा चर्चेत येत असतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून रसिका लॉस अँजेलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. तिथेच तिची ओळख आदित्यसोबत झाली. पुढे दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता ते लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

टॅग्स :रसिका सुनिलमाझ्या नवऱ्याची बायको