Join us

‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’ अभिनेत्यांनी घेतली बॉक्सिंगची ट्रेनिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:13 PM

एक अभिनेता म्हणून अनेक आव्हानात्मक दृश्ये केल्यानंतर निशांतने हल्लीच आपला सहकलाकार जतिन शाह (रावत) सोबत बॉक्सिंगचे एक दृश्य साकारले.

डॅशिंग आणि देखणा अभिनेता निशांत सिंग मलकानी झी टीव्हीवरील लोकप्रिय प्राईमटाईम मालिका ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’मधील अक्षतच्या रूपात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याला अॅक्शन दृश्ये साकारायला अतिशय आवडतात. एक अभिनेता म्हणून अनेक आव्हानात्मक दृश्ये केल्यानंतर निशांतने हल्लीच आपला सहकलाकार जतिन शाह (रावत) सोबत बॉक्सिंगचे एक दृश्य साकारले. हे दृश्य थोडे जास्तच गंभीर झाले आणि ह्या पॉवर-पॅक दृश्यात हवे असलेले भाव मिळवण्यासाठी जतिनने निशांतला थोडे जास्तच जोरात पंच केले.

ह्या अॅक्शन दृश्यामध्ये रावत अक्षतला मैत्रीपूर्ण बॉक्सिंग मॅचसाठी पुकारतो आणि त्याला मारतो आणि बदल्याच्या भावनेमध्ये अंतराच्या खुनाबद्दल अक्षतला अपराधी सिद्ध करावे हा त्याचा खरा हेतू असतो. ह्या अॅक्शन सीक्वेन्सबद्दल निशांत खूपच उत्साहात होता आणि तो ह्या मॅचसाठी लगेचच तयारही झाला. एका चित्रपटामध्ये त्याने स्ट्रीट बॉक्सर म्हणून काम केले होते आणि त्यासाठी त्याने बॉक्सिंगचे प्रशिक्षणही घेतले होते. निशांत आणि जतिन ह्या दोघांनीही अगदी सहजपणे हे दृश्य साकारले आणि आपल्या बॉक्सिंग कौशल्याने त्यांनी सर्वांना थक्क केले. त्यांना पाहून दिग्दर्शकांनाच नाही तर उपस्थित सर्वांनाच त्यांच्या कामाप्रति समर्पणाबद्दल कौतुक वाटले. निशांत म्हणाला,“जेव्हा मी ह्या सीक्वेन्सबद्दल ऐकले तेव्हा मला खूपच आनंद झाला कारण मला अॅक्शन दृश्ये करायला आवडतात. हे दृश्य आणखी खास होते कारण ही बॉक्सिंगची मॅच होती आणि मी नाशिक येथून बॉक्सिंगचे प्रशिक्षणही घेतले आहे आणि त्या कौशल्याचा मला ह्या दृश्याच्या चित्रीकरणामध्ये खूप फायदा झाला.” तो पुढे म्हणाला, “जेव्हा जतिन आणि मी ह्या भागासाठी तयारी करत होतो, तेव्हा आम्ही आमचे २०० टक्के द्यायचे ठरवले आणि आम्हांला हे दृश्य एका टेकमध्ये करायचे होते. चित्रीकरणादरम्यान जतिनने मला खरोखरीच पोटात जोरदार मुक्का मारला पण तरीही आम्ही थांबलो नाही. तो शॉट झाल्यानंतर जतिनला खूपच वाईट वाटत होते आणि त्याने माझी माफीही मागितली पण मी जाणतो की आम्ही दोघेही त्या दृश्यात अगदी हरवून गेलो होतो आणि त्यामुळे मला काही त्याचे वाईट वाटले नाही. आम्ही अनेक वर्षांपासून चांगले मित्र आहोत आणि हे सगळे आम्ही खिलाडूवृत्तीने स्वीकारले.” निशांत आणि जतिनला जुंपताना पाहायला आम्हीही उत्सुक आहोत.