Join us

Gudhi Padwa: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रींचं गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत ढोल वादन, व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 15:51 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

आज हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे. घरोघरी गुढी उभारुन महाराष्ट्रात हिंदू नववर्षाचं स्वागत केलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढण्याचीही परंपरा आहे. या शोभायात्रेत सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. यंदाही सेलिब्रिटींनी शोभायात्रेत सहभागी होत चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला होता. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने कोल्हापूर येथे निघालेल्या शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी तिने ढोलवादनही केले. याचे फोटो समोर आले आहेत. रसिकाने या शोभायात्रेनिमित्त पारंपरिक लूक केला होता.

वनिता खरातही डोंबिवलीत निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झाली होती. यावेळी वनितालाही ढोल वाजव्याचा मोह आवरता आला नाही. वनिताचा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतील ढोल वाजवतानाचा व्हिडिओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 

दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने गुढीपाडव्याचा सण साजरा करतात. यावर्षीही कलाकारांनी गुढी उभारुन सण साजरा करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. अनेक कलाकारांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा यंदा साजरा केला.  

टॅग्स :गुढीपाडवामहाराष्ट्राची हास्य जत्रावनिता खरातटिव्ही कलाकार