Join us

ओळखा पाहू या दोन वेण्या घातलेल्या मुलीला, छोट्या पडद्यावरील आहे सगळ्यात डिमाडिंग अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:02 IST

Tv Actress: टेलिव्हिजनवरील ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने आपल्या कॉमिक टायमिंगने लोकांना हसायला भाग पाडले आहे.

छोट्या पडद्यावर अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या कॉमिक टायमिंगने लोकांना खळखळून हसायला भाग पाडले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ulta Chashma) मालिकेतील दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानी (Disha Vakani) आहे. छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेमध्ये अनेक व्यक्तिरेखा पाहायला मिळाल्या आणि या पात्रांचे अनेक चेहरेही बदलले, पण दयाबेन ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिच्या जागी निर्मात्यांना अद्याप दुसरी अभिनेत्री सापडलेली नाही. दिशा वकानीने दयाबेनची व्यक्तिरेखा इतकी सशक्त केली आहे की चाहत्यांना तिच्याशिवाय दुसरे कोणीही नको आहे.

दिशा वकानीने तिच्या अभिनयाने लाखो लोकांना वेड लावले आहे. छोट्या पडद्यावर दयाबेनची कॉमिक टायमिंग अप्रतिम आहे. अशा परिस्थितीत दिशा वाकानीशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. नुकताच दिशा वकानीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिने दोन वेण्या घातल्या आहेत. केसात गजरा माळला आहे. कानात झुमके घातले आहेत. टिकली लावली आहे. या फोटोत ती खूपच क्युट दिसते आहे.

दिशाचा हा फोटो चाहत्यांना खूप भावला आहे आणि चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये, दिशा शोमधून बाहेर पडल्यापासून, चाहते तिच्या शोमध्ये परत येण्याची वाट पाहत आहेत. अशा स्थितीत दिशाच्या रिप्लेसमेंटला आणण्याचा निर्मात्यांनी एकदा विचार केला, पण ही गोष्ट प्रेक्षकांना आवडली नाही. चाहत्यांना दयाबेनच्या पात्रात फक्त दिशालाच पाहायचे आहे.

टॅग्स :दिशा वाकानीतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा