दिव्यांका त्रिपाठी बनली 'गुलाबो',पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 6:54 AM
छोट्या पडद्यावची सगळ्या अभिनेत्रींमध्ये दिव्यांका त्रिपाठी आज लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. ...
छोट्या पडद्यावची सगळ्या अभिनेत्रींमध्ये दिव्यांका त्रिपाठी आज लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्याविषयी प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. नुकत्याच झालेल्या पार्टीत दिव्यांकाने तिची ऑनस्क्रीन मुलगी रुहानिका धवन आणि अदिति भाटियासह मस्त थिरकताना दिसली. खुद्द दिव्याकाने त्यांचा हा डान्स व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया भट्टचे गाणं 'गुलाबो' या गाण्यावर हे तिघेही थिरकताना दिसतायेत.गेल्या काही दिवसांपासून दिव्यांका थोडी तिच्या एका चाहत्यावर चांगलीच भडकली असल्याचे तिने दिलेल्या कमेंटमधून कळतंय.दिव्याकाने तिचा पती विवक दहियासह एक स्विट सेल्फी शेअर केला होता.त्या फोटोवर एका चाहत्याने म्हटले होते, विवेकने दिव्यांकवार कधीच खरं प्रेम केलं नाही.आज दिव्यांकाकडे पैसा,प्रसिध्दी यामुळे दिव्यांकासह विवेकने लग्न केले असे म्हटले होते. यांवर दिव्यांकाचा राग अनावर झाला आणि तिने या कमेंटवर चाहत्याला खडसावले. दिव्यांकाने म्हटले की, नुसते बोलयाचे म्हणून बोलत बसू नये,ही कामं तुमच्या सारख्या फालतु आणि बेकार लोकच करू शकतात.जर तुला आमच्या नात्याविषयी काही माहिती नाही.तर तुला यावर बोलण्याचा काही अधिकार नाहीय.तेव्हापासून दिव्यांका थोडी नाराज असल्यामुळे ती आता जास्त सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नसते.मात्र या पोस्टनंतर दिव्यांकाने एकही पोस्ट केली नव्हती ब-याच दिवसांनंतर दिव्यांकाने तिचा राग शांत झाल्यानंतर हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.8 जुलैला दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झाले. लग्नाची पहिली अॅनीव्हर्सरी त्यांनी परदेशात सेलिब्रेट करत एकमेकांसह क्वॉलिटी एन्जॉय केल्याचे तिच्या व्हॅकेशन फोटोवरून पाहायला मिळतंय.