Join us  

अखेर माफी मागावीच लागली, चला हवा येऊ द्या फेम कलाकाराला अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 4:46 PM

हिंदी मालिकेत काम करणार्‍या अभिनेत्री गुलकी जोशीमुळे तुषार देवल (Tushar Deval) मनस्ताप सहन करावा लागला होता.

अलीकडेच 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya ) या लोकप्रिय कार्यक्रमात संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तुषार देवल (Tushar Deval).त्याच्या पोस्टमुळे चर्चेत होता. हिंदी मालिकेत काम करणार्‍या अभिनेत्री गुलकी जोशीमुळे  त्याला मनस्ताप सहन करावा लागला..अभिनेत्री गुलकी जोशी(Gulki Joshi)ने तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सिंटाचा कार्ड दाखवले. त्यात तुषारचा मोबाईल नंबर होता. हा मोबाईल नंबर ब्लर न करताच तो अपलोड करण्यात आला. मोबाईल नंबर हा ख्यातीचा समजून लोक तुषारलाच फोन करुन पिडत होते. अखेर घडल्या प्रकाराबाबत गुलकीने तुषारची माफी मागितली आहे, 

तुषारने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओमध्ये गुलकी म्हणतेय, मागच्या मुलाखतीतमध्ये मी सिंटाचे कार्ड दाखवले होते. त्या कार्डवर एक नंबर होता. तो नंबर माझा नाही. तो एक तुषार देवल या व्यक्तीचा आहे. मला माहिती आहे तुम्हाला सर्वांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा असतो. पण माझा नंबर समजून अनेकांनी तुषारला फोन केला. दिवसभरात त्यांना 100 ते 200 कॉल केलेय जातायेत. या प्रकारामुळे त्याना नाहक त्रास झालाय. मी तुम्हा सर्वांना विनंती करते कृपया तो फोन नंबर डिलीट करा. मी त्यांना ओळखत देखील नाही. असे या व्हिडीओ गुलकी बोलताना दिसतेय.  

काय घडला होता नेमका प्रकार?गुलकी जोशीने यूट्यूब इंटरव्ह्यूमध्ये कार्ड दाखवले. ज्यावर तुषाराचा मोबाईल नंबर होता.  हा मोबाईल नंबर ब्लर न करताच तो अपलोड करण्यात आला. मोबाईल नंबर हा ख्यातीचा समजून लोक तुषारलाच फोन करुन पिडत होते. अनेकांना तुषारने हा ख्यातीचा नंबर नसल्याचेही सांगितले. पण तरीही काही फायदा झाला नाही. अखेर त्याने एका मित्राच्या मदतीने ख्यातीपर्यंत घडलेला प्रकार पोहचवला. ख्यातीने व्हिडीओमध्ये मोबाईल नंबर ब्लर केला. पण हे सगळं करण्यात खूप उशीर झाला होता तोपर्यंत हा नंबर प्रचंड व्हायरल झाला होता. 

टॅग्स :चला हवा येऊ द्या