टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'मॅडम सर'मधील एसएचओ हसीना मलिकाची भूमिका साकारणारी गुल्की जोशी कोरोना संक्रमित झाली आहे. थोडा अशक्तपणा जाणवल्यानंतर गुल्कीने तिची कोरोना टेस्ट केली ज्याचा पॉझिटीव्ह आली आहे.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, गुल्कीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असतानाही या मालिकेचे शूटिंग थांबले नाही किंवा ती पटकन जाऊन होम क्वॉरंटाईन झाली नाही. मालिकेचे शूटिंग चालूच राहिली आणि गुल्कीने तिची एका एपिसोडमधीस राहिलेले सीन्स पूर्ण केले.
रिपोर्टनुसार, जेव्हा गुल्कीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे हे कळल्यावर तिला क्वॉरंटाईन व्हायला सांगण्याएवजी उरलेली काही सीन्स पूर्ण करायला सांगण्यात आले. गुल्कीनेसुद्धा लोकांमध्ये शूटिंगही केले आणि नंतर जाऊन होम क्वॉरंटाईन झाली. शूटिंग थांबवावे लागले या भीतीने या गोष्टीला लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे पण खुद्द गुल्कीने सोशल मीडियावर तिला कोरोनाची लगाण झाल्याचे सांगितले.
रिपोर्टनुसार, शोच्या निर्मात्यांचा हेतू असा होता की ही बातमी बाहेर आली नाही तर शोचे शूटिंग थांबवावे लागणार नाही किंवा संपूर्ण युनिटची कोरोना टेस्ट करावी लागणार नाही. पण मंगळवारी(आज) संपूर्ण युनिटची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. शूटिंग मात्र अजूनही सुरु आहे. गुल्कि 25 ऑक्टोबरपर्यंत होम क्वॉरंटाईन असणार आहे.