'गुलमोहर' प्रेक्षकांसाठी सादर करत आहे 'उधारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 6:06 AM
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'गुलमोहर' मधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षांची मने जिंकली आहेत.येत्या आगामी भागात गुलमोहर 'उधारी'नावाची कथा प्रेक्षकांसाठी सादर ...
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'गुलमोहर' मधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षांची मने जिंकली आहेत.येत्या आगामी भागात गुलमोहर 'उधारी'नावाची कथा प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे.ही कथा उधारीवर गरज भागविणाऱ्या सदा आणि त्याची बायको मनीषा या दोघांची आहे.मीनल बाळ यात मनिषाची भूमिका करत आहे तर सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता सागर कारंडे हा सदाची व्यक्तिरेखा साकारत आहे.कोणीतरी म्हटलेच आहे की 'अंथरूण' पाहून पाय पसरावेत ते अगदी खरे आहे आणि ही म्हण उधारी या कथेचा पाय आहे. या कथेतील सदा मानाने खूप चांगला आहे पण त्याला लोकांकडून उधारी घ्यायची वाईट सवय आहे.अर्थात त्याचा त्यामागील उद्देश उधारी देणाऱ्याला लुटण्याचा नसून त्याची ती मानसिकता आहे मात्र त्याच्या या सवयीचा परिमाण त्याची बायको मनीषा हिच्यावर होतो.तिला चारचौघात स्वाभिमानाने फिरत येत नाही.उधार घेण्याच्या या सवयीपासून मनीषा सदाला कशी बाहेर काढते?त्यात तिला यश मिळते का?अशा वेगळ्याच मानसिकतेत अडकलेल्या सदाला मनीषा कशा प्रकारे बाहेर काढेल? सदा त्याच्या सवयीवर मात करेल का? अशा सगळ्या गोष्टी गुलमोहरमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे.रोल..कॅमेरा..अॅक्शन.. त्यांच्या या तीन शब्दांच्या हुकमावरून सेटवरची सर्व सूत्रे हलण्यास सुरुवात होते. एखाद्या जहाजाची दिशा त्याचा कप्तान ठरवितो, त्याप्रमाणे दिग्दर्शक हा मालिका तसेच चित्रपटाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलत असतो. दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून मालिका आकार घेत असते. पण जेव्हा हाच दिग्दर्शक मुख्य अभिनेता होतो तेव्हा नेमकं काय होतं या सगळ्या गोष्टी नुकतेच रसिकांनी अनुभवले.'गुलमोहर' ही सिरीज खरंतर प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळीं हेच दिग्दर्शित करतात पण कथा थोडी हटके होती आणि त्या गोष्टीला न्याय देणारा एक चांगला अभिनेता हवा होता. जेव्हा त्यांनी ही कथा त्यांच्या युनिट ला ऐकवली तेव्हा सगळ्यांनाच मंदार देवस्थळींनी ही भूमिका करावी असे सुचवले.भूमिकेला मंदार देवस्थळी योग्य निवड आहे असे वाहिनीने सुद्धा सुचवले. मग काय दिग्दर्शकाची धुरा फ्रेशर्स फेम दिग्दर्शक अनिरुद्ध शिंदे कडे सोपवत एका अभिनेत्याच्या भूमिकेत त्या पात्राला योग्य न्याय दिला .