‘खिचडी’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत गुलशन ग्रोव्हर करणार एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 7:54 AM
अभिनेत्री सुप्रिया पाठक या शोमध्ये हंसाची भूमिका साकारत असून त्यांना ही व्यक्तिरेखा फार आवडते असे नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. ...
अभिनेत्री सुप्रिया पाठक या शोमध्ये हंसाची भूमिका साकारत असून त्यांना ही व्यक्तिरेखा फार आवडते असे नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. त्या सांगतात, “हंसा ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जी कायमच सदाबहार राहील. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या भयानक गोष्टींपासून अनभिज्ञ अशी ती सदैव आनंदात असते. त्यामुळे जेव्हा मला कामाचा कंटाळा येतो तेव्हा मीसुद्धा हंसासारखीच होते.”खिचडी ही मालिका २००२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेने जवळजवळ दोन वर्षं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ही मालिका संपल्यानंतर २००५ मध्ये याच मालिकेची संपूर्ण टीम घेऊन निर्माते जे.डी.मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी इन्स्टंट खिचडी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली होती. आहेत. खिचडी या मालिकेत आपल्याला पारेख कुटुंबात घडत असलेली धमाल मस्ती पाहायला मिळाली होती.या कुटुंबातील हंसा आणि प्रफुल्ल यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. खिचडीचा नवा सिझन नुकताच सुरू झाला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलीच पसंती मिळत आहे. मालिकेत आणखी रंजक वळणं रसिकांना पाहायला मिळावी या उद्देशाने बॉलिवूडमधले लोकप्रिय चेहरेही खिचडी मालिकेत एंट्री करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मालिकेच्या आगामी भागांतील एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी बॉलिवूडचा ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोव्हर याची निवड केली आहे. या नामवंत कलाकाराने आता बॉलिवूडनंतर हॉलिवूड सिनेमांमध्येही आपली छाप पाडली आहे.मालिकेची संपूर्ण टीम गुलशन ग्रोव्हर यांच्याबरोबर काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.मालिकेत ते वेगळ्याच भूमिकेत रसिकांना पाहायला मिळतील त्यासाठी निर्मांत्यांनी खास तयारीही सुरु केली आहे.तसेच सिनेमानंतर टीव्ही हे माध्यमही अतिशय प्रभावी माध्यम असल्यामुळे सारेच लोकप्रिय प्रसिद्ध चेहरे टीव्हीकडे वळताना पाहायला मिळतंय.तसेच गुलशन ग्रोव्हर हे टीव्हीच नाही तर वेबसिरीजमध्येही झळकले आहेत.याविषयी त्यांनी सिएनएक्समस्तीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की,वेबसिरिज हे एन्टरटेन्मेंटचे पुढचे भविष्य आहे असेच मी म्हणेन.सध्या अनेक वेबसिरिज आपल्याला पाहायला मिळत आहेत.पण रसिकांना कोणत्या प्रकारच्या वेबसिरिज आवडतात हे सांगणे आजही खूपच कठीण आहे. कारण आज अनेक वेबसिरिजमध्ये शिव्या देणारी मंडळी दाखवली जातात. तसेच अतिशय अॅडल्ट कंटेट पाहायला मिळतंय.त्यामुळे या वेबसिरिज आपल्या कुटुंबियांसोबत पाहाणे अशक्य आहे.पण त्यातही 'बॅडमॅन'सारख्या अतिशय चांगल्या आणि कुटुंबियांसोबत पाहाता येणाऱ्या वेबसिरिज बनवल्या जात आहेत.रसिकांना वेबसिरिजमध्ये काय पाहायला मिळते हे काही काळात आपल्याला नक्की कळेल असे मला वाटते.