'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत रोशनसिंह सोढी ही भूमिका साकारलेला अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) काही महिन्यांपूर्वी गायब झाला होता. ५२ वर्षीय हा अभिनेता 25 दिवसांनी परत आला. सध्या अभिनेता वाईट काळातून जात आहे. गुरचरणच्या डोक्यावर कोटींचं कर्ज आहे. कसंबसं तो हे कर्ज फेडत आहे आणि कामाच्या शोधात आहे. इतकंच काय तर कर्जामुळे त्याने खाणं सोडलं असून केवळ लिक्विड डाएटवर असल्याचा खुलासा त्याने केला आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंह म्हणाला, "लोकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मलाही खूप काम करायचं आहे जेणेकरुन मी स्वत:चा खर्च भागवू शकेल. पालकांना सांभाळू शकेन. मी महिनाभरापासून काम शोधत आहे. पुन्हा काम सुरु करुन दुसरी इनिंग करायची माझी इच्छा आहे. मला ईएमआय भरण्यासाठी पैसे कमवायचे आहेत आणि क्रेडिट कार्डचंही बिल भरायचं आहे. मला लोकांकडे पैसे मागावे लागत आहेत. काही चांगले मित्र मला उधारीही देतात."
ते पुढे म्हणाले, "मी ३४ दिवसांपासून लिक्विड डाएटवर आहे. दूध, चहा आणि नारळपाणी एवढंच घेत आहे. ४ वर्षांपासून मी फक्त अपयश पाहत आहे. वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. बिझनेस करायचाही प्रयत्न केला पण सगळं फेल झालं. आता मी थकलोय आणि कमवायची माझी इच्छा आहे."
गुरुचरणने क्रेडिट कार्डचे 60 लाख रुपये थकवले आहेत. मित्रांकडूनही 60 लाख घेतले आहेत. एकूण 1 कोटी 20 लाख रुपयांचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे.