Join us

'इंजेक्शनचा मारा, वाढलेलं वजन..'; एग्स फ्रीज करताना प्रसिद्ध अभिनेत्रीने सहन केली त्रासदायक प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 8:46 AM

Riddhima pandit : रिद्धिमाने तिचे एग्स फ्रीज केले असून यासाठी तिला त्रासदायक प्रक्रियेतून जावं लागलं होतं.

'बहु हमारी रजनीकांत' या मालिकेतून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिद्धिमा पंडीत. 'बिग बॉस ओटीटी'मध्ये ती अखेरची झळकली होती. त्यानंतर ती फारशी कुठे दिसली नाही. मात्र, सध्या रिद्धिमा तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत येत आहे. रिद्धिमाने अलिकडेच एक मुलाखत दिली असून यात तिने एग्स फ्रीज करण्याविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. तिने तिचा अनुभव शेअर केला असून अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

३३ वर्षीय रिद्धिमाने तिचे एग्स फ्रीज केले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया किती त्रासदायक आहे तिने सांगितलं. "ज्यावेळी मी एग्स फ्रीज करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझं कामही सुरु होतं. शुटिंग सुरु होतं. यात सतत इंजेक्शन घ्यावे लागायचे. या प्रक्रियेचा आरोग्यावर, शरीरारवर परिणाम होत होता. सतत पोटात मुरडा येणे, वजन वाढणे या सगळ्या समस्या निर्माण होत होत्या.  हे सगळं शारीरिक दृष्ट्या खूप थकवणारं होतं. अनेक जण म्हणतात, की एग्स फ्रीज करतांना तुम्ही जाड होता. मात्र, ते सत्य नाही. परंतु, हर्मोनल इंजेक्शन्समुळे शरीरात काही बदल घडतात", असं रिद्धिमा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "भविष्यात मी लग्न करेन की नाही हे आता मी सांगू शकत नाही. आता हे योग्य जोडीदार मिळण्यावर सगळं अवलंबून आहे. पण, गेल्या काही काळात महिला स्वत:चं सगळं एकटीने छान मॅनेज करतात. कदाचित मला सुद्धा एकटीलाच हे सगळं सांभाळायला आवडेल. पण, आता मला निदान पुढची चिंता नाही कारण, मी बायोलॉजिकली माझं काम केलं आहे."

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारबिग बॉस