&TV वर 'हप्पू की उलटन पलटन' हा नवा शो ४ मार्चपासून सुरु होणार आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना विनोदी आणि गमतीशीर किस्से पाहता येणार आहेत. दरोगा हप्पू सिंग, त्याची 'दबंग दुल्हन', हट्टी आई आणि नऊ मस्तीखोर मुलं असे धमाल किस्से यात असतील. आई, पत्नी आणि दंगेखोर पलटन म्हणजेच त्याची मुलं यांच्यातील चढाओढीत दरोगा फसला आहे. या मालिकेत योगेश त्रिपाठी, हिमानी शिवपुरी, प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार शरद व्यास, रंगमंचावरील अभिनेत्री कामना पाठक असे दमदार कलाकार आहेत.
या मालिकेतील भूमिकेविषयी हप्पू सिंग साकारणारे योगेश त्रिपाठी म्हणाले, ''हप्पू की उलटन पलटन म्हणजे एक प्रकारे माझी स्वप्नपूर्तीच आहे. मी हप्पू सिंग साकारण्यास सुरुवात केली तेव्हा कल्पनाही केली नव्हती की प्रेक्षकांच्या मनात माझ्यासाठी खास स्थान निर्माण होईल. एक संपूर्ण मालिका हप्पू सिंग या व्यक्तिरेखेवर आधारित असावी, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. अशी अप्रतिम संधी मिळाल्याबद्दल आभार मानण्यास शब्दही अपुरे पडतील. मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचा आभारी आहे आणि हप्पू सिंग की पलटनवर ही ते असेच भरभरून प्रेम करतील, अशी आशा आहे. हप्पू आणि त्याच्या कुटुंबातीलअनोख्या गोष्टींनी प्रेक्षकांना आम्ही हसवू शकू, अशी आशा आहे.''
आपल्या भूमिकेविषयी हिमानी शिवपुरी म्हणाल्या,''हप्पू की उलटन पलटन' मध्ये मी हप्पूची आई म्हणजेच कटोरी अम्माची भूमिका साकारतेय. मला या भूमिकेविषयी विचारण्यात आलं तेव्हाच मला माहीत होतं की व्यक्तिरेखा बाजी मारणार. त्यामुळे, होकार देताना मी फारसा विचार केला नाही. प्रेक्षकांना आनंद देणे, त्यांना हसायला लावणे, हा फार मोठा सन्मान असतो. शिवाय, अशा छान टीमसोबत काम करताना आनंदात भरच पडते. कटोरी अम्मा ही कुटुंबप्रमुख आहे. ती काहीशी हटवादीही आहे. आपल्या नऊ नातवंडांसाठी ती प्रेमळ आजी आहे. मात्र, सुनेसोबत तिचे सतत खटके उडत असतात. आनंददायी कथानक, विनोदी पटकथा आणि कटोरी अम्मा व इतर व्यक्तीरेखांमधील गमतीशीर नातं यामुळे प्रेक्षकांना धमाला मनोरंजन मिळणार आहे, हे नक्की. विनोद आणि नाट्याने भरलेल्या या आनंदसफरीचा भाग होण्यासाठी झी फॅमिली पॅक घेण्याचे आवाहन मी &TVच्या चाहत्यांना करत आहे.''